Join us

कंबरेत वेदना-सांधेही दुखतात? डॉक्टर सांगतात ५ गोष्टी करा, पन्नाशीनंतरही हाडं मजबूत राहतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:44 IST

Doctor Suggests Calcium Vitamin D Rich Foods : खासकरून महिलांना मेनोपॉजनंतर कॅल्शियम आणि व्हिटामीन डी च्या कमतरतेचा सामना करावा लागतो.

वाढत्या वयात शरीरात बरेच बदल होत  जातात. ४० वर्षांनंतर या  बदलांचा सगळयात मोठा परिणाम  हाडांवर होतो. वाढत्या वयात हाडांची व्यवस्थित काळजी घेणं फार महत्वाचे आहे. वेळोवेळी हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही प्रयत्न करायला हवेत. वयाच्या  चाळिशीनंतर हाडांमध्ये घनत्व कमी होऊ लागते. खासकरून महिलांना मेनोपॉजनंतर कॅल्शियम आणि व्हिटामीन डी च्या कमतरतेचा सामना करावा लागतो.

हाडं कमजोर झाल्यास छोटी जखम झाल्यानंतरही तुटू शकतात. डॉ. अमित शर्मा यांच्यामते हाडांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणं फार महत्वाचे आहे. काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही हाडं चांगली ठेवू शकता. (Orthopedic Doctor  Suggests Calcium Vitamin D Rich Foods For Strong Bones After 50 Years)

वयाच्या  चाळिशींतर कॅल्शियम, व्हिटामीन गरजेचं

डॉ, अमित यांच्यामते या वयात कॅल्शियमयुक्त पदार्थांचे अधिकाधिक सेवन करायला हवे. शरीरात व्हिटामीन डी असते तेव्हाच कॅल्शियम व्यवस्थित शोषले जाते. रोज सकाळी ८ ते १० वाजता ऊन्हात १० ते १५ मिनिटं बसणं फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त कॅल्शियमचा स्त्रोत जसं की दूध, दही, पनीर, पालेभाज्या, बदाम आणि मशरूमचे सेवन करा.

रोज हलका फुलका व्यायाम हाडं आणि सांध्यांना सक्रिय ठेवतो. दिवसातून  ३० मिनिटं चालणं हाडांना मजबूत बनवते.  ताडासन, वृक्षासन यांसारखी योगासनं हाडं आणि मांसपेशींना उत्तम बनवतात. व्यायाम करण्याऐवजी सायकलिंग करा.

मेंदूवर हल्ला करतात पत्ता कोबीतील अळ्या; अटॅक येण्याचाही धोका, डॉक्टरांनी सांगितले उपाय

ऊन्हाद्वारे मिळणार व्हिटामीन डी हाडांसांसाठी अमृताप्रमाणे आहे. खासकरून हिवाळ्याच्या दिवसांत सकाळंच ऊन घ्यायला विसरू नका. व्हिटामीन डी कॅल्शियम अवशोषित करण्यात मदत करतो ज्यामळे हाडं मजबूत होतात.

आयुर्वेदात हाडांच्या मजबूतीसाठी अनेक प्राकृतिक उपाय सांगितले आहेत. यामुळे केवळ हाडं मजबूत राहत नाहीत  तर सूज  कमी होण्यास मदत होते. अश्वगंधा आणि शिलाजित यांसारखे पदार्थ हाडं मजबूत करण्यास  मदत करतात तसंच सांध्याचा लवचीकपणा यामुळे वाढतो.

ऑफिसवेअरसाठी घ्या सिंपल कॉटनच्या साड्या; २३ नवीन पॅटर्न्स, साडीत सुंदर, प्रोफेशनल लूक येईल

जंक फूड आणि गॅस तयार होणारे पदार्थ खाणं टाळा. हाडांच्या मजबूतीसाठी हिरव्या भाज्या, फळं आणि प्रोटीन्सयुक्त आहार घ्या. गुडघ्यांच्या वेदनांपासून त्रस्त असलेल्यांनी हाय इंटेसिटी व्यायाम करणं टाळायला हवं. हलके व्यायाम मांसपेसी आणि हाडांना फायदा पोहोचवतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स