Diarrhea Home Remedies : पावसाच्या दिवसांमध्ये वेगवेगळे आजार वाऱ्यासारखे सगळीकडे पसरत असतात. ज्यातील एक गंभीर आजार म्हणजे डायरिया. डायरियानं बरेच लोक वैतागलेले असतात. ही एक अशी स्थिती आहे ज्यात व्यक्तीला दिवसात तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टॉयलेट जावं लागतं. पातळ पाण्यासारखी संडास येत असल्यानं गलंगपणाही खूप जास्त वाढतो.
डायरिया झाला तर पोटात वेदना, मुरडा येणे, सतत टॉयलेटला जावं लागणे असा त्रास होतो. त्याशिवाय ही समस्या झाल्यावर व्यक्तीला डिहायड्रेशन होण्याचा अधिक धोका असतो. कारण शरीरातून भरपूर पाणी निघून जातं. त्यामुळे यावर वेळीच उपाय करणं महत्वाचं ठरतं. यावर न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी एक आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे.
न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्यानुसार, डायरियामुळे सुरू झालेले जुलाब गोळ्यांनी रोखण्याऐवजी एक आयुर्वेदिक काढा पिऊ शकता. हा काढा लगेच आराम देतो. महत्वाची बाब म्हणजे हा काढा बनवण्यासाठी फार मेहनतीही घ्यावी लागत नाही. केवळ चार गोष्टींच्या मदतीनं आपण हा काढा बनवू शकतो. ज्यामुळे सतत टॉयलेटला जाण्याची समस्या दूर होऊ शकते.
डायरियामध्ये बेस्ट आयुर्वेदिक काढा
जर आपल्याला डायरिया झाला असेल किंवा सतत टॉयलेटला जावं लागत असेल तर जराही वेळ न घालवता हा आयुर्वेदिक उपाय करा. श्वेता शाह यांनी हा काढा बनवावा आणि त्याचे फायदे काय होतात याबाबत माहिती दिली आहे.
काढ्यासाठी साहित्य
हा खास काढा बनवण्यासाठी आपल्याला केवळ चार गोष्टींची गरज पडेल. एक छोटा चमणे धणे, एक छोटा चमचा जिरे, एक छोटा चमचा खडीसाखर आणि अर्धा चमचा सूंठ.
कसा बनवाल?
- काढा बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात दोन कप पाणी उकळा. त्यात धणे, जिरे आणि सूंठ टाका. १० ते १२ मिनिटं उकळवा. दोन कपाचं एक कप पाणी शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करा. हे मिश्रण गाळून एका कपात काढा. त्यात बारीक केलेली खडीसाखर घाला. हा काढा कोमट असेल तेव्हा एक एक घोट करत प्या.
कसा मिळतो फायदा?
हा काढा प्यायल्यानंतर पोटाला आराम मिळतो आणि टॉयलेट जाणं बंद होऊ शकतं. शाह यांच्यानुसार, या काढ्यानं पचन अग्नि शांत होते. आतड्यांमधील इन्फेक्शन कमी होतं. पित्त संतुलित राहतं. सूज कमी होते.
डायरिया झाल्यावर काय करू नये?
श्वेता शाह सांगतात की, डायरिया झाला असेल तर लोकांनी काही चूका अजिबात करू नये. जसे की, दूध पिऊ नये. त्याशिवाय जड काहीच खाऊ नये. लगेच आराम देणाऱ्या गोळ्यांनी जुलाब थांबवू नका. उलट शरीरातील विषारी तत्व नॅचरल रूपाने बाहेर पडू द्या. असं केल्यास पोट आतून साफ होईल.
इतरही काही उपाय
- श्वेता शाह सांगतात की, जर हा उपाय केल्यावरही पातळ संडास थांबत नसेल तर चिमुटभर जायफळाची पूड मोशन बंद करण्यास मदत करू शकते. पण हा उपायच करा तेव्हा याची गरज असेल.
- त्याशिवाय पातळ संडास होत असल्यानं शरीरातून भरपूर पाणी कमी होतं. अशात डीहायड्रेशनची समस्या होऊ शकते. ही होऊ नये म्हणून दिवसभर मीठ, साखर आणि लिंबूचं मिश्रण असलेलं पाणी पित रहावं.