Join us

सारखं फ्रिजमधलं पाणी पिता? मग आत्ताच थांबा .. गार पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2025 17:06 IST

Like drinking water from the fridge? read this before drinking cold water : गार पाणी पिणे शरीरासाठी चांगले नाही. पाहा काय होते.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मनाला शांती आणि पोटाला आराम गार पदार्थांमुळे मिळतो. मस्त थंडगार काही प्यायल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जाते. (Like drinking water from the fridge?  read this before drinking cold water)घशाला बरे वाटते तसेच पोटालाही बरे वाटते. उन्हाळा सुरु झाला की फ्रीज तांबे-बाटल्यांनी भरुन जातो. अख्खीच्या अख्खी बाटली आपण पिऊन टाकतो. साध्या पाण्याने मन भरत नाही. गार पाणी प्यायल्यावरच समाधान मिळते. मात्र अति प्रमाणात असे गार पाणी पिणे चांगले आहे का? कोणतीच गोष्ट अति खाणे किंवा पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. अगदी पाणीसुद्धा. (Like drinking water from the fridge?  read this before drinking cold water)

पोटाला गरजेचा असलेला थंडावा साध्या पाण्यातूनही मिळतोच. फळांच्या रसातून मिळतो. थंडावा देणार्‍या अन्नातून मिळतो. गार पाणी प्यायल्याने नक्कीच समाधान मिळते. मात्र उन्हाळा संपेपर्यंत फक्त गारच पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. 

गार पाणी पिणे शरीरासाठी चांगले नाही असे गुंजन शाऊट्स या चॅनलवरुन एक्सपर्ट्सनी सांगितले. तसेच इतरही अनेक डॉक्टरांची आणि तज्ज्ञांचे गुगलवर आर्टिकल्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये गार पाणी सतत पिऊ नका असे स्पष्ट सांगितले आहे. 

उन्हाळ्याच्या दिवसांमध्येही तुम्हाला खोकला होतो का? मग तो खोकला गार पाणी प्यायल्यामुळेच झाला आहे. गार पदार्थांमुळे सर्दी खोकला होतो हे तर आपण जाणून आहोत. गार पाण्यामुळे घसा खराब होतो. आवाजही बदलतो. सर्दी खोकला जास्त दिवस राहिला तर त्यामुळे ताप येणे तसेच इतरही काही इंनफेक्शन्स होण्याची शक्यता असते. 

गार पाण्याचा पचन संस्थेवर परिणाम होतो. अपचनाचे प्रमाण वाढते. पचनासाठी पाण्याची फार आवश्यकता असते. गरम पाणी प्यायचा सल्ला डॉक्टर देतात अगदी त्या उलट गार पाण्याचे आहे. गार पाण्याचा पचनसंस्थेला जास्त काही फायदा होत नाही. त्यामुळे गॅसेस होतात. ब्लोटींग होते. पचन चांगले न झाल्याने इतरही काही समस्या उद्भवतात. 

त्यामुळे पाणी साधेच प्यावे. थोडे गार पाणी पिणे नक्कीच त्रासदायक नाही. थंड पाणी प्यायल्याने उन्हामुळे आलेला थकवा जाऊन जरा तरतरी येते. त्यामुळे आपल्याला गार पदार्थ प्यावेसे वाटते. मात्र त्याचे प्रमाण जास्त होऊ देऊ नका. माठातील पाणी प्या. ते नैसर्गिक रित्या गार झालेले असते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सपाणीआरोग्यकिचन टिप्स