Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > खिशात कांदा ठेवून उन्हात गेलं तर ऊन बाधत नाही, हे खरं की खोटं? उष्माघात टाळायचा तर..

खिशात कांदा ठेवून उन्हात गेलं तर ऊन बाधत नाही, हे खरं की खोटं? उष्माघात टाळायचा तर..

Keeping Onion In Pocket During Summer Fact : आजही ग्रामीण भागात बरेच लोक उन्हापासून बचाव करण्यासाठी खिशात कांदा ठेवून (Onion For Heatstroke) बाहेर पडतात. पण खरंच खिशात कांदा ठेवल्याने उष्माघाताचा धोका टाळतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:33 IST2026-03-10T11:55:52+5:302026-03-10T16:33:38+5:30

Keeping Onion In Pocket During Summer Fact : आजही ग्रामीण भागात बरेच लोक उन्हापासून बचाव करण्यासाठी खिशात कांदा ठेवून (Onion For Heatstroke) बाहेर पडतात. पण खरंच खिशात कांदा ठेवल्याने उष्माघाताचा धोका टाळतो का?

Is keeping onion in pocket during summer can avoid heatstroke or heatwave, know the facts | खिशात कांदा ठेवून उन्हात गेलं तर ऊन बाधत नाही, हे खरं की खोटं? उष्माघात टाळायचा तर..

खिशात कांदा ठेवून उन्हात गेलं तर ऊन बाधत नाही, हे खरं की खोटं? उष्माघात टाळायचा तर..

Keeping Onion In Pocket During Summer Fact : उन्हाचा पारा सध्या राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये चांगलाच वाढलय (Heatwave). उन्हाचे चटके, असह्य गरमी आणि घामाच्या धारांमुळे लोक वैतागलेले आहेत. आता कुठे मार्च महिना सुरू झालाय, अशात एप्रिल आणि मे मध्ये काय स्थिती असेल याचा विचार करूनच घाबरायला होतं. जे लोक जास्त वेळ उन्हात राहतात, गरम हवेच्या संपर्कात आल्याने, चेहरा आणि डोकं गरम हवेच्या संपर्कात आल्याने उष्माघाताचा धोका वाढतो. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळे घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करतात. तर आजही ग्रामीण भागात बरेच लोक उन्हापासून बचाव करण्यासाठी खिशात कांदा ठेवून (Onion For Heatstroke) बाहेर पडतात. पण खरंच खिशात कांदा ठेवल्याने उष्माघाताचा धोका टाळतो का? जर आपल्याला सुद्धा हा प्रश्न पडलो असेल तर याचं उत्तर जाणून घेऊया.

एक्सपर्ट काय सांगतात? 

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, हीट स्ट्रोकच्या स्थितीत व्यक्तीचं शरीर फार जास्त गरम होतं. सोबतच शरीराचं तापमान संतुलित ठेवण्याचं शरीराचं मेकॅनिज्म फेल होतं. त्यामुळे हीट स्ट्रोकमध्ये शरीर आपलं तापमान कंट्रोल करू शकत नाही. अशात जेव्हा खिशात कांदा ठेवून बाहेर पडण्याचा उपाय तसा काही फायदेशीर ठरत नाही. जुन्या काळात वाहनांची जास्त सोय नव्हती, ज्यामुळे लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात पायी चालत जावं लागत होतं. यामुळे उन्हाळ्यात लोक खिशात कांदा ठेवत होते. कारण यात वॉलटाईल ऑइल असतं, त्यामुळे असं मानलं जातं की, कांद्याने शरीराचं तापमान सामान्य ठेवण्यास मदत होते. पण केवळ कांदा खिशात ठेवून उष्माघाताचा धोका कमी करणं शक्य नाही. कारण याचा कोणताही ठोस असा वैज्ञानिक पुरावा नाही.  

खिशात नाही आहारात करा समावेश

अनेक एक्सपर्ट सांगतात की, उष्माघातापासून बचावासाठी कांदा खिशात नाही तर आहारात ठेवा. उन्हाळ्यात जेवणासोबत कच्चा कांदा खाणं खूप फायदेशीर ठरतं. यात फायबर, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी ६, पोटॅशिअमसहीत अनेक पोषक तत्व असतात. सोबतच यातील फोलेट, कॅल्शिअम आणि आय़र्न उन्हाळ्यात आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

उष्माघाताची लक्षणं? 

उष्माघातात शरीराचं तापमान वेगाने वाढतं आणि शरीरात डिहायड्रेशनची समस्या होऊ लागते. अशात शरीरात पाणी कमी होतं. या स्थितीत घाम येणं बंद होतं आणि शरीरातून उष्णता बाहेर पडू शकत नाही. सोबतच शरीरात क्रॅम्प येतात आणि कमजोरी वाढते. तसेच बेशुद्ध पडू शकता किंवा चक्करही येऊ शकते. कन्फ्यूजन होतं आणि याचा प्रभाव मानसिक स्थितीवर पडतो. तसेच उष्माघातात शरीर गरम होणे आणि लाल होणे, घाम अजिबात न येणे, हृदयाचे ठोके वाढणे, श्वासासंबंधी समस्या अशीही लक्षणं दिसतात.

उष्माघातापासून बचावासाठी आहार

एक्सपर्ट्सनुसार, जर रोजचा आहार योग्य असला तर उष्माघातापासून बचाव करता येऊ शकतो. नॅशनल हेल्थ पोर्टलवर असलेल्या एका माहितीनुसार, लोकांनी उन्हाळ्यात ताजी फळं, भाज्या आणि ज्यूसचं सेवन केलं पाहिजे. यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण बरोबर राहतं. ज्यामुळे शरीराला डिहायड्रेशनपासून बचाव करण्यास मदत मिळते. शरीरात पाणी कमी झालं तर उष्माघाताचा धोका जास्त राहतो.

उन्हाळ्यात काय खावं?

उन्हाळ्यात रोज संत्री, अननस, कलिंगड, द्राक्ष खावीत.

कांदे, पुदिना आणि खरबूज्याचं सॅलडही शरीर थंड ठेवतं.

रोज एक किंवा दोन ग्लास फळांचा ज्यूस प्यावा.

दही, छास किंवा लस्सीचं सेवन करावं. 

दिवसभर भरपूर पाणी प्यायला विसरू नका.

Web Title : क्या जेब में प्याज रखने से लू से बचाव होता है? सच्चाई

Web Summary : लू से बचाव के लिए जेब में प्याज रखने का कोई वैज्ञानिक प्रमाण नहीं है। विशेषज्ञ प्याज को आहार में शामिल करने, ताज़े फल, सब्जियां खाने और हाइड्रेटेड रहने की सलाह देते हैं।

Web Title : Does Onion in Pocket Prevent Heatstroke? The Truth Revealed

Web Summary : Keeping onion in pocket for heatstroke is not scientifically proven. Experts recommend including onion in diet, eating fresh fruits, vegetables, and staying hydrated to prevent heatstroke effectively.