सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे अजूनही बऱ्याच ठिकाणी वातावरण थंड आहे. त्यातही दिवसा ऊन आणि रात्री किंवा पहाटे गारठा असं हवामान आहे. यामुळे मग अनेकांना हवेतला हा बदल सहन होत नाही आणि सर्दी, खोकला, कफ असे त्रास सुरू होतात. लहान मुलांना तर हा त्रास होण्याचे प्रमाण जास्त आहे. आता ज्या मुलांना सर्दी, खोकला होतो किंवा छातीमध्ये कफ असतो, अशा मुलांना थंड पदार्थ देणं टाळलं जातं. त्यात सगळ्यात आधी नाव येतं ते केळीचं. केळी खाल्ल्यामुळे सर्दी, खोकला वाढतो असं अनेकांचं म्हणणं असतं, तर त्यामुळे खरंच काही होत नाही, असंही काहीजण अगदी खात्रीने सांगतात. पण यापैकी नेमकं काय खरं आहे ते पाहा..(is it safe to give banana to kids when they are suffering from cold and cough?)
सर्दी, खोकला, कफ असल्यावर लहान मुलांना केळी देणं टाळावं का?
डॉक्टर असं सांगतात की सर्दी किंवा खोकला होणे हा एक प्रकारचा व्हायरल त्रास असतो. जसं जसं मुलांना झालेलं इन्फेक्शन कमी कमी होत जातं तसा तसा खोकला किंवा सर्दीही कमी होत जाते.
४ फसवे पदार्थ- हेल्दी समजून खाल्ले जातात पण असतात खूपच घातक, वजन, शुगर दोन्हीही वाढतं...
केळी किंवा एखादं फळं खाल्ल्याने ते इन्फेक्शन शरीरात तसंच राहातं किंवा केळी खाल्ल्याने सर्दी किंवा खोकला होतो असं ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे सर्दी झाली किंवा छातीत कफ झाला म्हणून मुलांची केळी बंद करू नका. जर त्याला केळीमध्ये असणाऱ्या एखाद्या घटकाची ॲलर्जी असेल तर मात्र डाॅक्टरांचा सल्ला घेऊन केळी खावी की नाही, हे ठरवा, अशी डॉ. सौरभ कटारिया यांनी दिलेली माहिती आजतकने प्रकाशित केली आहे.
यात तज्ज्ञ असंही सांगतात की केळी हे थंड प्रकृतीचं फळ आहे. त्यामुळे ते सर्दी झालेली असताना खाऊ नये. पण मेडीकल सायन्समध्ये असं कोणत्याही अभ्यासातून ठोसपणे समोर आलेलं नाही.
गुलाबाच्या छोट्याशा रोपालाही येतील भरपूर कळ्या, सोपा घरगुती उपाय- जादू झाल्यासारखं बहरेल रोप
उलट सर्दी, खोकला किंवा कोणतंही व्हायरल इन्फेक्शन झालेलं असताना भूक कमी होते. अशावेळी केळी दिली तर त्यातून भरपूर एनर्जी मिळते आणि अशक्तपणा येत नाही. त्यामुळे तुमच्या मुलांना किंवा तुम्हालाही सहन होत असेल तर सर्दी झालेली असताना केळी खाण्यात काहीही गैर नाही.
Web Summary : Giving bananas to kids with coughs isn't harmful unless allergic. Viral infections cause colds; bananas provide energy when appetite decreases. No scientific evidence links bananas to worsened cold symptoms. Consult a doctor for allergies.
Web Summary : सर्दी-खांसी होने पर बच्चों को केला देना हानिकारक नहीं है, जब तक एलर्जी न हो। वायरल संक्रमण से सर्दी होती है; केला भूख कम होने पर ऊर्जा देता है। केले का सर्दी के लक्षणों को बढ़ाने से कोई वैज्ञानिक संबंध नहीं है। एलर्जी के लिए डॉक्टर से सलाह लें।