कांदा हा आपल्या आहारात जवळपास रोजच असतो. कोणत्या ना कोणत्या भाजीमध्ये, आमटीमध्ये, सलाडमध्ये कांद्याचा वापर असतोच. कांदा जर जेवणात असेल तर आपोआपच जेवणाची चव जास्त खुलून येते. त्यामुळे कित्येक लोकांना तर कांदा तोंडी लावल्याशिवाय जेवणच जात नाही. आता असा हा कांदा आपण रोजच स्वयंपाकात वापरत असलो तरी त्याच्याबाबतच्या कित्येक गोष्टी अनेकांना माहितीच नाहीत. त्यावर आलेली काळी बुरशी आपल्याला दिसते, पण आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि तो कांदा खातो (Is it okay to eat onion with black layer?). हे करणं कितपत योग्य आहे आणि त्याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया..(what is black powder on onion peel?)
काळसर बुरशी आलेला कांदा खावा का?
आपण बऱ्याचदा पाहातो की कांद्याचे वरचे देठ आणि त्याचे बाह्य आवरण यावर कित्येकदा काळ्या रंगासारखी पावडर दिसते. कांदा चिरताना ही पावडर आपल्या हातालाही लागते. ती काळी पावडर म्हणजे कांद्यावरची बुरशी किंवा कांद्यावर जमा झालेलं फंंगस असतं.
नवरात्रीमध्ये साडी नेसल्यावर गळ्यात हवंच ठसठशीत लांब मंगळसूत्र! बघा ९ लेटेस्ट सुंदर डिझाईन्स...
या पावडरचं मायक्रोस्कोपखाली सुक्ष्म निरिक्षण केलं असता त्यामध्ये जंतूही दिसतात. जेव्हा कांदा व्यवस्थित साठवला जात नाही किंवा आपण जेव्हा तो दमट, ओलसर आणि स्वच्छ प्रकाश न येणाऱ्या जागी साठवून ठेवतो तेव्हा कांदा हळूहळू सडायला लागतो आणि त्याच्यावर काळ्या रंगाचं फंगस तयार व्हायला लागतं.
असा काळं फंगस असणारा कांदा कधीही कच्चा खाऊ नये असं तज्ज्ञ सांगतात. ज्या कांद्याच्या बाहेरच्या आवरणाला काळी बुरशी लागलेली दिसेल तो बाह्य भाग आणि त्याच्या आतलीही एखादी- दुसरी पाकळी काढून टाकावी.
अभ्यासासोबतच मुलांना ४ गोष्टीही शिकवा! खऱ्या आयुष्यात बनतील 'चॅम्पियन', सगळेच करतील कौतुक..
यानंतर तो संपूर्ण कांदा पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यावा आणि नंतरच तो शिजवावा. तो तसाच कच्चा खाल्ला तर त्या फंगसचा वाईट परिणाम शरीरावर होतो. पचनसंस्था, श्वसनसंस्था यावर त्याचा दुष्परिणाम होतो.