Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दिवसा भरपूर पाणी प्या पण रात्री झोपण्यापूर्वी नको, असं का? झोपण्यापूर्वी पाणी कुणी प्यावे, कुणी नाही?

दिवसा भरपूर पाणी प्या पण रात्री झोपण्यापूर्वी नको, असं का? झोपण्यापूर्वी पाणी कुणी प्यावे, कुणी नाही?

Is Drinking Water at Night Before Bed Bad for You? : तुम्ही पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2024 03:25 PM2024-05-23T15:25:02+5:302024-05-23T17:38:10+5:30

Is Drinking Water at Night Before Bed Bad for You? : तुम्ही पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिता का?

Is Drinking Water at Night Before Bed Bad for You? | दिवसा भरपूर पाणी प्या पण रात्री झोपण्यापूर्वी नको, असं का? झोपण्यापूर्वी पाणी कुणी प्यावे, कुणी नाही?

दिवसा भरपूर पाणी प्या पण रात्री झोपण्यापूर्वी नको, असं का? झोपण्यापूर्वी पाणी कुणी प्यावे, कुणी नाही?

पाणी शरीरासाठी आवश्यक आहे (Drinking Water). प्रत्येकाने पुरेसे पाणी प्यावे जेणेकरुन शरीराची पाण्याची गरज भागते आणि शरीर डिटॉक्सिफाय होते. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे (Health tips). परंतु रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्याबाबत वेगवेगळ्या सल्ले दिल्या जातात. काही लोक रात्री पाणी पिऊ नये असे म्हणतात. तर, काही जण रात्रीच्या वेळेस पाणी पिण्यास सांगतात. पाणी शरीरासाठी आवश्यक. पण रात्री पाणी प्यावं की नाही? असा प्रश्न निर्माण होतो.

मेडिसिन नेटच्या वेबसाईटनुसार, 'रात्री पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास किंवा झोपण्याच्या एक-दोन तास आधी पाणी प्यायल्यास, रात्री शरीराची पचनक्रिया चांगली होते आणि सकाळी शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात'(Is Drinking Water at Night Before Bed Bad for You?).

'दिवसा खाल्लेलं अन्न रात्री पचते. रात्री झोपण्याच्या दोन तास आधी पाणी प्यायल्यास अन्नातील सर्व पोषक तत्वे शरीरात व्यवस्थित शोषली जातात. जे उर्जेमध्ये रूपांतरित होतात. यामुळे शरीरातील चयापचय क्रियाही मजबूत होते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.'

डोळ्यांची नजर तेज ते लठ्ठपणा! कोणत्या रंगाचा गाजर आहे सुपर पौष्टीक? पचनही सुधारेल आणि..

कोमट पाणी प्या

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते. यामुळे सततच्या ॲसिडिटीपासूनही आराम मिळतो आणि ऋतूजन्य आजारांपासूनही शरीराचे सरंक्षण होते.

रात्री झोपण्यापूर्वी एक किंवा दोन तास आधी पाणी प्यावे

झोपण्याच्या दीड ते दोन तास आधी पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे. झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे योग्य नाही.

चहा करताना साखर आधी घालावी की नंतर? फक्कड चहा घरी करताना घाला '१' सिक्रेट पदार्थ

अशा रुग्णांनी रात्री जास्त पाणी पिऊ नये

बीपीचे रुग्ण, हृदयरोग, किडनीचे रुग्ण तसेच मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नये. कारण या लोकांना रात्री झोपेचे चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे. रात्री जास्त पाणी प्यायल्याने रात्री वारंवार लघवीला वारंवार लागते. ज्यामुळे झोपेचे चक्र पूर्ण होत नाही. झोपेचं चक्र बिघडल्याने उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे, वजन वाढण्याची समस्या निर्माण होते.

Web Title: Is Drinking Water at Night Before Bed Bad for You?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.