शिड्या चढताना अनेकांना दम लागतो. अनेकदा लोक १०-१२ शिड्या चढल्यानंतर लगेच थकून जातात. अशा स्थितीला सामान्य मानून बरेच लोक दुर्लक्ष करतात. दम लागणं सामान्य नसून अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. जर जिने चढताना तुम्हाला दम लागत असेल तर कोणती समस्या असू शकते. ते समजून घ्यायला हवं. शिड्या चढताना जर तुम्हाला दम लागत असेल यामागे २ कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे तुमची फुफ्फुसं व्यवस्थित काम करत नाहीत आणि दुसरं म्हणजे तुमची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आहे. (If You Feel Breathless While Climnig Stairs You May Be Suffering From These Serious Diseases Do Not Ignore This Symptom)
शिड्या चढताना दम लागत असेल तर काही समस्या असू शकतात
शिड्या चढताना दम लागत असेल तर रुग्णाची स्थिती गंभीर असू शकते. शिड्या चढताना दम लागला म्हणजे फुफ्फुसं कमकुवत झालेली असू शकतात अशावेळी त्वरीत डॉक्टरांकडे जायला हवं आणि तपासणी करायला हवी तसंच लाईफस्टाईलमध्ये बदल करून तुम्ही आपली तब्येत चांगली ठेवू शकता. लठ्ठपणानं ग्रासलेल्या लोकांनाही शिड्या चढताना दम लागतो.
१ घरगुती मॅजिक लिक्विड- हातानं किंवा ब्रशनं न घासताही चमकेल टॉयलेट; खर्च जेमतेम १० रुपये
वजन वाढल्यामुळे फुफ्फुसांच्या भिंतींवर जास्त वजन पडते. ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज धूम्रपान केल्यामुळे होतात. स्मोकिंगमुळे फुफ्फुसं पूर्णपणे डॅमेज होतात. या कारणामुळे शिड्या चढताना दम लागतो. ज्या लोकांचे हृदय कमकुवत असते त्यांना शिड्या चढताना त्रास होतो. तुम्हालाही श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरीत हेल्थ चेकअप करून घ्या.
जिने चढायला त्रास होत असेल तर काय करावे?
घाई घाईनं पायऱ्या चढण्याऐवजी संथ गतीनं चढा. एकावेळी एकच पायरी चढा. श्वास रोखून धरू नका. नाकानं दीर्घ श्वास घ्या आणि तो तोंडानं हळू सोडा. शक्य असल्यास एक पायरी चढताना श्वास घ्या आणि दुसरी चढताना सोडा. जर मजले जास्त असतील तर प्रत्येक १० ते १२ पायऱ्यांनतर थोडा वेळ थांबून श्वास सामान्य होऊ द्या. चढताना जास्त पुढे वाकू नका, पाठ सरळ ठेवा. ज्यामुळे फुफ्फुसांना प्रसरण पावण्यास पुरेशी जागा मिळेल.
