lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > खाण्याच्या सवयींमुळे भारतीय आजारी पडतात! ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितलं, सतत आजारपण नको तर..

खाण्याच्या सवयींमुळे भारतीय आजारी पडतात! ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितलं, सतत आजारपण नको तर..

ICMR releases dietary guidelines, says 56% diseases in India liked to diet : ICMR ने सांगितलं रोज किती तेल, किती साखर अन् रोजच्या थाळीत कोणत्या पदार्थांचा समावेश करावा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2024 03:15 PM2024-05-10T15:15:32+5:302024-05-10T16:07:03+5:30

ICMR releases dietary guidelines, says 56% diseases in India liked to diet : ICMR ने सांगितलं रोज किती तेल, किती साखर अन् रोजच्या थाळीत कोणत्या पदार्थांचा समावेश करावा..

ICMR releases dietary guidelines, says 56% diseases in India liked to diet | खाण्याच्या सवयींमुळे भारतीय आजारी पडतात! ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितलं, सतत आजारपण नको तर..

खाण्याच्या सवयींमुळे भारतीय आजारी पडतात! ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितलं, सतत आजारपण नको तर..

बहुतांश जणांची जीवनशैली सध्या बिघडत चालली आहे (Health tips). वातावरणातील बदलासह खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोक आजारी पडत असल्याचं इंडिअन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटलं आहे (ICMR). भारतातील ५६.४ टक्के आजार हे चुकीच्या आहारामुळे होत असल्याचं समोर आलं आहे.

याच गोष्टीची दखल घेत, जवळपास १३ वर्षांच्या कालावधीनंतर, ICMR अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय पोषण संस्थाने जीवनशैलीतील बदल, रोग आणि खाण्याच्या सवयी लक्षात घेऊन, भारतीयांसाठी आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. शिवाय लोकांना निरोगी आहाराचा सल्ला देण्यात आला आहे(ICMR releases dietary guidelines, says 56% diseases in India liked to diet).

ICMR ने सांगितले - दररोज किती साखर खावी?

राष्ट्रीय पोषण संस्थेच्या मते, 'पोषक तत्वांनी परिपूर्ण आहार घेतल्यास हृदयाशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. आपण स्वतःला मधुमेहापासून दूर ठेऊ शकता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या मते, भारतीय लोकांनी त्यांच्या आहारात दररोज २० ते २५ ग्रॅम साखरेचं मर्यादित प्रमाणात सेवन करायला हवं.

मग - बादली फुटली? पाणी गळून वाया जातं? चमचाभर बेकिंग सोड्याचा सोपा उपाय- फेकून देण्याची गरजच नाही..

भारतीयांनी प्रोटीन सप्लिमेंट टाळण्याचा सल्ला दिला

एनआयएनने भारतीयांना प्रोटीन सप्लिमेंट टाळण्याचा सल्ला दिला आहे. प्रोटीन पावडरचे नियमित सेवन करणे योग्य नसल्याचे अनेक दावे आहेत. प्रोटीन पावडरमध्ये साखर, नॉन-कॅलरी स्वीटनर्स आणि बरेच कृत्रिम घटक असू शकतात. त्यामुळे शक्यतो याचे सेवन नियमित करणे टाळावे.

रोग टाळण्यासाठी किती प्रमणात तेलाचा वापर करावा?

एनआयएनप्रमाणे अन्न व औषध प्रशासनने आहारात तेलाचा कमी वापर करण्याचा सल्ला दिला आहे. एफडीएच्या म्हणण्यानुसार, मानवी शरीराला दररोज सरासरी दीड चमचे तेल लागते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एका दिवसात २० ग्रॅमपेक्षा जास्त तेल खाऊ नये. जास्त तेलाच्या सेवनाने हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो. एखादी व्यक्ती मधुमेहासारख्या आजारांना बळी पडू शकते.

जेवणाचं ताट वाढलं की तुम्ही आधी काय खाता? पाहा रोजच्या जेवणात पदार्थांचा योग्य क्रम

उत्तम आरोग्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?

आपल्या दैनंदिन आहारात ३९६ ग्रॅम धान्य, २८ ग्रॅम कडधान्य, ८२ ग्रॅम दूध व दुग्धजन्य पदार्थ, ४९ ग्रॅम भाज्या आणि १४ ग्रॅम तेल किंवा तुपाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला राष्ट्रीय पोषण संस्थेने दिला आहे. हा डाएट प्लॅन फॉलो केल्याने आजार टाळता येऊ शकतो. शिवाय आरोग्य सुदृढ राहू शकते.

Web Title: ICMR releases dietary guidelines, says 56% diseases in India liked to diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.