Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळ्यात तहानच लागत नाही, डिहायड्रेशन होते? आहारात हवेच ४ पदार्थ - रहा हायड्रेटेड कायम!

पावसाळ्यात तहानच लागत नाही, डिहायड्रेशन होते? आहारात हवेच ४ पदार्थ - रहा हायड्रेटेड कायम!

Foods That Can Help You To Stay Hydrated In Monsoon : How To Stay Hydrated In Monsoon : Hydration Tips for the Rainy Season : Best Food To Stay Hydrated In Monsoon :आहारतज्ज्ञ सांगतात, पावसाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नेमके कोणते पदार्थ खावेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2025 14:47 IST2025-07-15T14:25:09+5:302025-07-15T14:47:01+5:30

Foods That Can Help You To Stay Hydrated In Monsoon : How To Stay Hydrated In Monsoon : Hydration Tips for the Rainy Season : Best Food To Stay Hydrated In Monsoon :आहारतज्ज्ञ सांगतात, पावसाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नेमके कोणते पदार्थ खावेत?

How To Stay Hydrated In Monsoon Foods That Can Help You To Stay Hydrated In Monsoon Hydration Tips for the Rainy Season Best Food To Stay Hydrated In Monsoon | पावसाळ्यात तहानच लागत नाही, डिहायड्रेशन होते? आहारात हवेच ४ पदार्थ - रहा हायड्रेटेड कायम!

पावसाळ्यात तहानच लागत नाही, डिहायड्रेशन होते? आहारात हवेच ४ पदार्थ - रहा हायड्रेटेड कायम!

प्रत्येक ऋतूंनुसार वातावरणात बदल होतात. कधी धो-धो पाऊस, तर कधी दमट हवामान तर कधी फारच उकडते. पावसाळा सुरु झाला की हवामानात बदल होतात, वातावरणात (Best Food To Stay Hydrated In Monsoon) भरपूर ओलावा आणि थंडावा जाणवतो. पावसाळ्यात अनेकदा (Foods That Can Help You To Stay Hydrated In Monsoon) आपण गरमागरम भजी, वडे असे अनेक तळलेले पदार्थ अगदी पोटभरुन मनसोक्तपणे खातोच. कितीही काहीही केलं तरी हे पदार्थ खाण्याचा मोह आवरताच येत नाही. याचबरोबर, पावसाळ्यात बरेचदा (Hydration Tips for the Rainy Season) आपल्याकडून पाणी कमी प्रमाणांत प्यायले जाते(How To Stay Hydrated In Monsoon).

पावसाळ्यात हवामानात आर्द्रता जास्त असल्यामुळे शरीरातून भरपूर प्रमाणात घाम येतो आणि पाण्याची कमतरता निर्माण होते. याच काळात आपल्याकडून कमी पाणी प्यायले जाते कारण या दिवसांत तहान फारच कमी लागते. परंतु, शरीराला दररोज ठराविक प्रमाणात पाण्याची गरज असते, आणि पाणी कमी प्याल्यास डिहायड्रेशन होऊ शकते. ही शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी, आपल्या रोजच्या आहारात अशा अन्नपदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे, जे शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवतात. Divya Gandhi’s Diet & Nutrition Clinic येथील आहारतज्ज्ञ दिव्या गांधी यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीत पावसाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नेमके कोणते पदार्थ खावेत याबद्दल अधिक माहिती दिली आहे. 

पावसाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नेमके कोणते पदार्थ खावेत? 

१. ब्रोकली :- पावसाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ब्रोकलीचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. ब्रोकलीमध्ये वॉटर कंटेंट भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे ब्रोकोली शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवायला मदत करते. ब्रोकलीमध्ये, आर्द्रता जास्त असल्याने तज्ज्ञ मर्यादित प्रमाणातच खाण्याचा सल्ला देतात. याशिवाय, पावसाळ्यात संसर्गाचा धोका वाढलेला असतो, त्यामुळे ब्रोकली नीट धुणे आणि पूर्णपणे शिजवूनच खाणेच गरजेचे असते. 

भुवया आणि पापण्यांचे केस पांढरे व्हायला लागले? बोटावर ‘हे’ तेल घेऊन करा मसाज- पाहा जादू...

२. टोमॅटो :- शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी टोमॅटो हा एक उत्तम पदार्थ आहे. अनेकजण टोमॅटोचा वापर सलाडमध्ये करतात. तज्ज्ञांच्या मते टोमॅटोमध्ये सुमारे ९४% पाणी असते, जे शरीरातील द्रवपातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. ज्यांना किडनीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी टोमॅटो खाणे टाळावे, असेही तज्ज्ञ सांगतात. तसेच, पावसाळ्याच्या दिवसांत टोमॅटो खाण्यापूर्वी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, कारण या काळात टोमॅटोवर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे टोमॅटो स्वच्छ धुवून आणि शक्यतो शिजवूनच खावेत. 

महिनाभर उपाशीपोटी प्या ओव्याचे पाणी, आरोग्याच्या अनेक जुनाट तक्रारीही दूर करणारा सोपा उपाय...

३. काकडी :- काकडी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. काकडीमध्ये सुमारे ९६% पाण्याचे प्रमाण असते, त्यामुळे ती शरीरातील द्रवपातळी टिकवून ठेवण्यास मदत करते. काकडी केवळ शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करत नाही, तर सांध्यांना योग्य प्रकारे लुब्रिकेट करण्यासही उपयोगी ठरते. यासोबतच, काकडीला व्हिटॅमिन 'के' आणि पोटॅशियमचा उत्तम स्रोत मानले जाते, जे हाडे आणि हृदयासाठी फायदेशीर ठरते. 

४. ढोबळी मिरची :- शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ढोबळी मिरचीचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये सुमारे ९२% पाण्याचे प्रमाण असते, जे शरीरातील द्रवपातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. पावसाळ्यात ढोबळी मिरची खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु या दिवसांत बहुतांश खाद्यपदार्थ लवकर खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे ती स्वच्छ धुवून आणि मर्यादित प्रमाणातच खावी.ढोबळी मिरची व्हिटॅमिन 'ए' आणि व्हिटॅमिन 'सी' चा उत्तम स्रोत आहे. याशिवाय, यामध्ये पोटॅशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स ही भरपूर प्रमाणात असतात जे शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यात उपयुक्त असतात.

Web Title: How To Stay Hydrated In Monsoon Foods That Can Help You To Stay Hydrated In Monsoon Hydration Tips for the Rainy Season Best Food To Stay Hydrated In Monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.