lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > असह्य दुखणं देणारं युरिक ॲसिड कमी करण्यासाठी रोज १ तमालपत्र 'या' पद्धतीने खा, असरदार उपाय

असह्य दुखणं देणारं युरिक ॲसिड कमी करण्यासाठी रोज १ तमालपत्र 'या' पद्धतीने खा, असरदार उपाय

How to Reduce Urid Acid : तमालपत्राच्या चहाचे सेवन केल्याने युरिक एसिड कंट्रोल होण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 08:47 PM2024-05-14T20:47:53+5:302024-05-15T16:13:34+5:30

How to Reduce Urid Acid : तमालपत्राच्या चहाचे सेवन केल्याने युरिक एसिड कंट्रोल होण्यास मदत होते.

How to Reduce Urid Acid : Joint Pain Due To Uric Acid Control Tips According To Research | असह्य दुखणं देणारं युरिक ॲसिड कमी करण्यासाठी रोज १ तमालपत्र 'या' पद्धतीने खा, असरदार उपाय

असह्य दुखणं देणारं युरिक ॲसिड कमी करण्यासाठी रोज १ तमालपत्र 'या' पद्धतीने खा, असरदार उपाय

युरिक ॲसिड (Uric Acid) सर्वांच्याच शरीरात असतो. जेव्हा खाण्यात प्युरिनयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढते तेव्हा रक्तात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते. (Health Tips) अशा स्थितीत किडनी फिल्टर करत नाही आणि लोक युरिक ॲसिडच्या कचाट्यात सापडतात. हळूहळू युरिक ॲसिड  सांध्यांमध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते या कारणामुळे सांध्यांमध्ये असहय्य वेदना सुरू होतात. (Urid Acid Control Tips)

कधी कधी या वेदना इतक्या वाढतात की उठायला आणि बसायलाही त्रास होतो. अशा स्थितीत या समस्या टाळण्याासाठी वेळीच कंट्रोल करायला हवं. काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्या टाळू शकता. किचनमध्ये असलेलं तमालपत्ता वापरून तुम्ही युरिक एसिड कंट्रोल करू शकता. तमालपत्राच्या सेवनाने युरिक ॲसिड कमी होण्यास मदत होते. (How To Reduce Uric Acid)

तमालपत्र पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो

युरोपियन युनियन डिजिटल लायब्ररीच्या रिसर्चनुसार  तमालपत्राच्या सेवनाने युरिक ॲसिड  कंट्रोल करता येते. व्हिटामीन सी, व्हिटामीन ई याव्यतिरिक्त कॅरोटीनॉईट, फ्लेवोनोइड्स यांसारखी एंटी ऑक्सिडेंट्स असतात तेजपत्त्याने हाय युरिक एसिडची जोखिम कमी होते.  तमालपत्राच्या सेवनाने प्युरिन नावाचे वेस्ट शरीरातून सहज बाहेर निघते. इतकंच नाही एंटीइंफ्लेमेटरी गुण वेदनांपासून आराम देतात. एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी डायबेटीक गुण इम्यून सिस्टिम मजबूत करण्यास मदत करतात.

तमालपत्राचा चहा कसा बनवायचा?

तमालपत्राचा चहा बनवण्यासाठी  तुम्ही १५ ते २० तमालपत्र घ्या नंतर व्यवस्थित धुवून घ्या. एका भांड्यामध्ये तीन ग्लास पाणी घाला आणि त्यात तमालपत्र घाला. नंतर गॅस सुरू करून  त्यावर पॅन ठेवा. त्यानंतर पाणी व्यवस्थित उकळू द्या. त्यानंतर पाणी एक ग्लास होईपर्यंत उकळवत राहा. या चहाचे सेवन करा. तमालपत्राच्या चहाचे सेवन केल्याने युरिक ॲसिड कंट्रोल होण्यास मदत होते.

औषधी गुणांनी परिपूर्ण तमालपत्राच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय श्वासांच्या समस्या ही उद्भवत नाहीत.  ब्रोंकाटिस, खोकला, अस्थमा, इन्फ्लूएंजापासून लोकांना आराम मिळतो.  

Web Title: How to Reduce Urid Acid : Joint Pain Due To Uric Acid Control Tips According To Research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.