Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मुलांना ऊन बाधतं, उन्हाळ्यात मुलं तापानं फणफणतात; डॉक्टर सांगतात-लहान मुलांची काय काळजी घ्यायची...

मुलांना ऊन बाधतं, उन्हाळ्यात मुलं तापानं फणफणतात; डॉक्टर सांगतात-लहान मुलांची काय काळजी घ्यायची...

Summer Health Problems In Children Know How To Manage : How to Manage 5 Common Summer Health Problems in Kids : 5 Tips to Help Kids Keep Safe During Summer : Summer Health Tips for Kids : उन्हाळ्यात मुलांना कोणते आजार होऊ शकतात तसेच त्यावर उपाय म्हणून त्यांची काळजी कशी घ्यावी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2025 18:55 IST2025-04-15T18:38:53+5:302025-04-15T18:55:46+5:30

Summer Health Problems In Children Know How To Manage : How to Manage 5 Common Summer Health Problems in Kids : 5 Tips to Help Kids Keep Safe During Summer : Summer Health Tips for Kids : उन्हाळ्यात मुलांना कोणते आजार होऊ शकतात तसेच त्यावर उपाय म्हणून त्यांची काळजी कशी घ्यावी...

How to Manage 5 Common Summer Health Problems in Kids 5 Tips to Help Kids Keep Safe During Summer Summer Health Tips for Kids | मुलांना ऊन बाधतं, उन्हाळ्यात मुलं तापानं फणफणतात; डॉक्टर सांगतात-लहान मुलांची काय काळजी घ्यायची...

मुलांना ऊन बाधतं, उन्हाळ्यात मुलं तापानं फणफणतात; डॉक्टर सांगतात-लहान मुलांची काय काळजी घ्यायची...

उन्हाळ्याच्या सिझनची आता सुरुवात झाली आहे. रणरणते ऊन आणि वाढती उष्णता, गरमी यामुळे जीव अगदी कासावीस होतो. उन्हाळा ऋतू मोठ्यांपासून लहानग्यांपर्यंत सगळ्यांनाच (Summer Health Problems In Children Know How To Manage) नकोसा वाटतो. आपल्यासारख्या मोठ्यांनाच या उन्हाचा इतका त्रास होतो, तिथे लहानग्यांची काय तऱ्हा... उन्हाळ्यात आपण स्वतःची काळजी घेण्यासोबतच घरातील लहान मुलांची देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे(How to Manage 5 Common Summer Health Problems in Kids).

उन्हाळ्यात लहान मुलांना अनेक प्रकारचे लहान मोठे उन्हाळी आजार होऊ शकतात, यामुळे मुलांना त्याचा फार त्रास होऊ शकतो. यासाठीच, वेळीच मुलांच्या आरोग्याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रेटर नोएडा वेस्ट येथील सर्वोदय हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना यादव यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीत उन्हाळ्यात मुलांना कोणकोणते आजार होऊ शकतात तसेच त्यावर उपाय म्हणून त्यांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल अधिक माहिती दिली आहे(Tips to Help Kids Keep Safe During Summer).

उन्हाळ्यात मुलांना कोणकोणत्या शारीरिक समस्यांचा धोका असतो... 

१. हिट स्ट्रोक :- उन्हाळ्यात मुलांना उष्माघाताचा धोका जास्त असतो. खरंतर, बहुतेक मुले शाळांना सुट्टी असल्याने दुपारी घराबाहेर उन्हांत खेळतात. यावेळी सूर्यप्रकाश खूप प्रखर असतो. परिणामी, मुलांना उष्माघाताचा त्रास सहज होऊ शकतो. लक्षात ठेवा की ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. जर उष्माघातावर वेळेच उपचार केले नाहीत तर ते मुलांसाठी खूप धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, याचा अवयवांवरही वाईट परिणाम होऊ शकतो.

फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...

२. त्वचेवर पुरळ रॅशेज येणे :- उन्हाळ्यात मुलांना हिट स्ट्रोकचा त्रास होण्याचा धोका असतो. खरंतर, उन्हाळ्याच्या दिवसात, थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे शरीराला खूप घाम येतो. घाम येणे हा आपल्या शरीराला थंडावा देण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. पण, जास्त घाम येणे आणि वेळेवर घाम न पुसल्याने त्वचेवर पुरळ आणि खाज येऊ शकते. कधीकधी त्वचेला खाज सुटल्याने त्या भागात ओरखडे, रॅशेज येतात, ज्यामुळे त्वचेची जळजळ होते. उन्हाळ्याच्या दिवसात पालकांनी आपल्या मुलांना सुती कपडे घालावेत. यामुळे पुरळ, रॅशेज येण्याची समस्या कमी होते. 

खरबुजाच्या बिया फेकून नुकसान करु नका, करा १० मिनिटांत खरबूज बियांचे मिल्कशेक! उन्हाळा गारेगार...

३. पोट खराब होणे :- उन्हाळ्यात मुलांना शिळे अन्न अजिबात खायला देऊ नका. कारण उन्हाळ्यात अन्नपदार्थ खूप लवकर खराब होतात. असे खराब अन्नपदार्थ खाल्ल्याने मुलांना पोटदुखी, पचनाच्या समस्या असे त्रास होऊ शकतात. मुलांची प्रतिकारशक्ती प्रौढांपेक्षा कमकुवत असते. खराब झालेले अन्न खाल्ल्याने त्यांना उलट्या, जुलाब होऊ शकतात. असे होऊ नये यासाठी मुलांना नेहमी ताजे अन्नपदार्थ खायला द्यावेत. 

४. डोळ्यांचा संसर्ग :- उन्हाळ्यात हवेमध्ये धुळीचे कण जास्त प्रमाणांत असतात. अनेकदा मुलं घराबाहेर खेळतं असतात. अशा परिस्थितीत, धुळीचे कण डोळ्यांत जाऊ शकतात, ज्यामुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. विशेषतः या दिवसात डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे मुलांना शक्यतो दुपारच्या प्रखर सूर्यप्रकाशात खेळायला घराबाहेर पाठवू नये. तसेच मुलांच्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. 

५. डिहाड्रेशन :- लहान मुले शक्यतो कमी प्रमाणांत पाणी पितात. त्यांच्या या समस्येकडे पालकांनी अजिबात दुर्लक्ष करु नये. मुलांना वारंवार, दिवसभरात पुरेसे पाणी प्यायल्या द्यावे. कमी पाणी पिल्याने शरीर डिहायड्रेट होते. जर पालकांनी त्याच्या या स्थितीकडे दुर्लक्ष केले तर त्याला कमी रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो  याचा त्याच्या आरोग्यावर आणखी वाईट परिणाम होऊ शकतो. 

उन्हाळयात पालकांनी मुलांची काळजी कशी घ्यावी ? 

१. दिवसा मुलांना घराबाहेर पडू देऊ नका, विशेषतः दुपारी किंवा प्रखर सूर्यप्रकाश असेल त्यावेळी बाहेर पाठवू नये. 

२. दिवसभरात मुलांना शक्य तितके पाणी पिण्यास सांगा.

३. मुलांना फक्त संध्याकाळीच बाहेर खेळायला पाठवा.

४. जर मूल आजारी असेल तर त्याला ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जा.

५. या दिवसात मुलांच्या आहारात द्रवपदार्थाचे प्रमाण वाढवा.

६. त्यांच्या शारीरिक स्वच्छतेची काळजी घ्या.

Web Title: How to Manage 5 Common Summer Health Problems in Kids 5 Tips to Help Kids Keep Safe During Summer Summer Health Tips for Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.