हिवाळ्याच्या दिवसांत तब्येतीकडे अधिक लक्ष द्यावे लागते. थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारव्यामुळे तब्येतीच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. या पासून बचावासाठी लोक आपल्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतात. त्यातीलच एक म्हणजे हळदीचं दूध (Benefits Of Drinking Turmeric Milk). आरोग्यतज्ज्ञ सुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हळदीचं दूध पिण्याचा सल्ला देतात. हळदीच्या दुधाच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात. हळदीचं दूध बनवण्याची योग्य पद्धत पाहूया.(How To Make Turmeric Milk)
एक ग्लास दुधात किती हळद घालावी?
प्रसिद्ध डायटिशियन शिल्पा अरोरा यांनी एका युट्यूब चॅनेलवरून हळदीचे दूध कसे प्यावे, याचे फायदे काय आहेत याबाबत अधिक माहिती दिली आहे. आहारतज्ज्ञ शिल्पा अरोरा यांच्यामते एक ग्लास दुधात फक्त १ चिमूटभर हळद घालावी. कारण जास्त प्रमाणात हळद घातल्यास चव बिघडू शकते तसंच पोटात गडबडसुद्धा होते. हळदीच्या दुधात चुटकीभर काळं मीठ जरूर घाला. काळ्या मिरीमुळे हळद व्यवस्थित एब्जॉर्ब होण्यास मदत होते.
हळदीच्या दुधात अजून काय घालू शकतो?
हळदीच्या दुधात तुम्ही बदामाची पावडर किंवा तूप मिसळू शकता. ज्यामुळे पचनक्रिया सुधारेल आणि गॅसेसच्या समस्येपासून आराम मिळेल. केसर घातल्यानं हॉर्मोनल बॅलेन्स व्यवस्थित राहील आणि त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो होण्यासही मदत होईल. वेलची घातल्यानं दुधाची चव आणि पचन दोन्ही उत्तम राहली.यात तुम्ही जायफळसुद्धा घालू शकता. जायफळ नर्व्हस सिस्टीम शांत करते आणि चांगली झोप येण्यासही मदत होते.
हळदीचे दूध कधी प्यावे?
हळदीचे दूध रात्री झोपण्याच्या २० मिनिटं आधी प्या. ज्यामुळे शरीरात व्यवस्थित उष्णता टिकून राहील, झोप चांगली लागेल. याशिवाय तुम्ही आपल्या नाईट रुटीनमध्ये हळदीच्या दुधाचा समावेश करू शकता.
हिवाळ्यात हळदीचं दूध का प्यावं?
1) आहारतज्ज्ञ सांगतात की हळदीत करक्यूमिन नावाचे कम्पाऊंड असते. जे एंटी इन्फ्लेमेटरी आणि एंटी ऑक्सिडेंट्स गुणांनी परीपूर्ण असतात. ज्यामुळे सर्दी खोकल्यापासून बचाव होण्यास मदत होते आणि शरीर आतून मजबूत बनते.
2) दुधातील ट्रिप्टोफॅन डोकं शांत ठेवते. ज्यामुळे हळद शरीराला उष्णता प्रधान करते. या दोन्हींमुळे झोप चांगली राहते. ज्या लोकांना रात्रीच्यावेळी झोप येत नाही त्यांनी झोपण्याआधी हे दूध जरूर प्यावे.
3) हळद आणि केसराचे कॉम्बिनेशन त्वचेचा ग्लो वाढवण्यास मदत करते. डायटिशियन सांगतात की हिवाळ्याच्या दिवसांत चुटकीभर केसर हळदीच्या दुधात मिसळून प्यायल्यानं हॉर्मोन बॅलेंन्स राहण्यास मदत होते.
