How to Make ORS at Home: उलटी-जुलाब, पोट बिघडणे किंवा डीहायड्रेशन झाल्यास शरीरातून पाणी, मीठ आणि मिनरल्स कमी होतात. अशा वेळी ORS खूप उपयोगी ठरतं. त्यामुळे लोक घरात ओआरएसचे पॅकेट्स स्टोर करून ठेवतात. पण बाजारात कधी कधी नकली किंवा केमिकलयुक्त ORS मिळाल्याच्या तक्रारी येतात, त्यामुळे गरज पडल्यास आपण घरच्या घरी WHO स्टँडर्ड पद्धतीने ORS तयार करू शकता. यातून होईल असं की, आपल्याला योग्य ते ओआरएस मिळेल आणि पैसेही वाचतील.
ORS बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी
6 चमचे साखर
अर्धा (1/2) चमचा मीठ
1 लिटर उकळलेले व थंड केलेले पाणी
प्रमाण अचूक ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. कारण साखर जास्त झाली तर जुलाब वाढू शकतात. मीठ जास्त झालं तर शरीराला नुकसान होऊ शकतं.
घरी ORS बनवण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत
हात स्वच्छ धुवा, जेणेकरून कोणतंही संक्रमण होणार नाही. पाणी उकळून पूर्ण थंड करून घ्या. एक स्वच्छ काचेची बाटली किंवा जार घ्या. त्यात 1 लिटर उकळलेले व थंड केलेले पाणी भरा. आता त्यात 6 चमचे साखर आणि ½ चमचा मीठ घालून मिसळा. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत चांगलं ढवळत रहा. घरचा ORS तयार झाला!
ORS कसा घ्यावा?
हे पाणी दिवसभरात थोडं-थोडं करून प्या. उलटी-जुलाब, अतिसार, उष्माघात किंवा शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास अतिशय उपयोगी. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी सुरक्षित.
घरचा ORS का आवश्यक?
उलटी-जुलाबामुळे शरीरातून कमी झालेलं पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स लगेच भरून काढतं. शरीराला लगेच ऊर्जा मिळते. डीहायड्रेशनमुळे होणारी कमजोरी थांबवतं. WHO प्रमाणित ORS उपलब्ध नसेल तर हा सुरक्षित पर्याय आहे.
