Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डोळ्यांना लांबचं कमी दिसतं? 'ही' भाजी खा, तब्येत चांगली राहील-नजर होईल तीक्ष्ण

डोळ्यांना लांबचं कमी दिसतं? 'ही' भाजी खा, तब्येत चांगली राहील-नजर होईल तीक्ष्ण

How To Improve Eyes Health : हिवाळ्याच्या दिवसांत गाजर खाणं फारच फायद्याचं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 15:37 IST2025-01-04T10:32:24+5:302025-01-04T15:37:46+5:30

How To Improve Eyes Health : हिवाळ्याच्या दिवसांत गाजर खाणं फारच फायद्याचं.

How To Improve Eyes Health : Eat Carrot For Good Eyes Food For Increase Eye Sight | डोळ्यांना लांबचं कमी दिसतं? 'ही' भाजी खा, तब्येत चांगली राहील-नजर होईल तीक्ष्ण

डोळ्यांना लांबचं कमी दिसतं? 'ही' भाजी खा, तब्येत चांगली राहील-नजर होईल तीक्ष्ण

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात लालटुचूक गाजर दिसायला सुरूवात होते (Winter Care Tips). गाजराचा वापर करून तुम्ही अनेक रेसिपीज बनवू शकता. जर तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांत गाजराचे सेवन करायचे असेल तर तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात.  हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही गाजराचे सेवन केले तर बरेच फायदे मिळतील. (Eat Carrot For Good Eyes)

गाजरात व्हिटामीन ए, व्हिटामीन सी,  व्हिटामीन के, पॅटोंथेनिक एसिड, फॉलेट, पोटॅशियम,  आयर्न, कॉपर यांसारखी तत्व असतात. गाजराचे सेवन केल्यानं इम्यूनिटी चांगली राहते. इम्यूनिटी मजबूत  राहिल्यानं शरीराचा संक्रमणापासून बचाव होतो.  डोळ्यांवरही सकारात्मक परिणाम होतो. गाजराचे सेवन तुम्ही कोणत्या पद्धतीनं करू शकता ते  समजून घेऊ. (How To Improve Eyes Health)

गाजराचे सेवन कसे करावे?

गाजराचा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करू शकता. जसं की गाजरचा  हलवा, गाजराचा ज्यूस,  गाजराचे सॅलेड, गाजराची भाजी, गाजराचे सूप इत्यादी...

गाजरात व्हिटामीन ए, बीटा कॅरोटीन असते ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. गाजरात एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. वय वाढण्याची प्रक्रिया संथ होते आणि शरीराला मदत होते.

गाजरात फायबर्सचे प्रमाण पुष्कळ असते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. पचनासंबंधित समस्या उद्भवत नाहीत.  यापासून  सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गाजराचे सेवन करू शकता. गाजराचे सेवन केल्यानं हृदयाचे आजार दूर होतात. यामुळे कोलेस्टेरॉल लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.

गाजरात व्हिटामीन सी असते ज्यामुळे इम्यूनिटी मजबूत राहण्यास मदत होते. इम्यूनिटी मजबूत राहिल्यानं शरीराचा अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून बचाव होतो.  गाजराचे सेवन केल्यानं त्वचा ग्लोईंग राहते. पिंपल्सची समस्या उद्भवत नाही.

गाजरात ८८ टक्के पाणी असते. याव्यतिरिक्त यात फायबर्स असतात. ज्यामुळे वजन संतुलित राहण्यास  मदत होते. याव्यतिरिक्त तुम्ही पूर्ण १ गाजर खाल्ल्यास तुम्हाला ८० कॅलरीज मिळतील ज्यामुळे पोट बराचवेळ भरलेलं राहील आणि  या भाजीचे सेवन केल्यानं वजन कंट्रोलमध्ये येण्यास मदत होईल.

Web Title: How To Improve Eyes Health : Eat Carrot For Good Eyes Food For Increase Eye Sight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.