चुकीची लाईफस्टाईल आणि अन्हेल्दी डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे तुमच्या हाडांच्या आरोग्यावर चुकीचा परीणाम होतो. डाएट प्लॅनमध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही हाडांना मजबूत बनवू शकता. रोजच्या आहारात अशा काही ड्राय फ्रुट्सचा समावेश करा ज्यामुळे बोन्स हेल्थ सुधारण्यास मदत होऊ शकते (How To Get Rid Of Joint Pain).
हाडांसाठी फायदेशीर
हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते मखाने खाल्ल्यानं कमकुवत हाडं चांगली राहतात. हाडांमध्ये ताकद येते. ज्या लोकांना सांधेदुखीच्या समस्या आहेत. त्यांनी यापासून सुटका मिळवण्यासाठी रोज मखान्यांचे सेवन करायला हवे. (How To Get Rid Of Joint Pain Eat Makhana To Boost Bone Health) तुम्ही रोजच्या आहारात दुधासोबत मखान्यांचे सेवन करू शकता.
पांढरे केस चमकतात-डायची सवयही नको? सदाफुलीचा १ जादूई उपाय, काळेभोर-दाट होतील केस
पचनक्रिया चांगली राहते
या ड्राय फ्रुट्समध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, जिंक, फायबर्सचे प्रमाण जास्त असते. मखान्यांमधील पोषक तत्व तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. मखाने गट हेल्थ चांगली राहण्यासाठी फायदेशीर ठरतात.
पोटाचे विकार टळतात
पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही मखान्यांना आपल्या आहाराचा एक भाग बनवू शकता. मखाने खाऊन तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहील. मखान्यांमधील पोषक तत्व गंभीर, जीवघेण्या आजारांचा धोका कमी करतात. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येतं. याव्यतिरिक्त वजन कमी करण्यासही मदत होते.