एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आणि वातावरणातील उष्णता आणखीनच वाढली. वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना वेगवेगळे त्रास सुरू होतात. त्या त्रासांपैकीच एक त्रास म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी होण्याचे प्रमाण वाढते आणि त्याचवेळी त्याठिकाणी खूप जळजळ होणे, आग होणे. अगदी बऱ्याच लहान मुलांनाही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा त्रास होतोच. हा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही उत्तम (home remedies to get rid of Burning & Itching while urinating). पण त्याआधी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सुचविलेला हा एक घरगुती उपायही तुम्ही करून पाहू शकता. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा..(how to get rid of Burning & Itching while urinating?)
उन्हाळी लागण्याचा त्रास कमी करण्यासाठी उपाय
उन्हाळी लागली असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो याविषयी मेरठ येथील डॉ. शकुल प्रकाश यांनी दिलेली माहिती नवभारत टाईम्सने प्रकाशित केली आहे.
बोटामध्ये काटा घुसल्यास पिन, सुई वापरू नका, 'हा' उपाय करा- काटा आपोआप बाहेर येईल
यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत की खडीसाखर बारीक कुूटून घ्या. खडीसाखरेची पावडर आणि बडिशेप सम प्रमाणात घ्या म्हणजेचे एकेक चमचा घ्या आणि ग्लासभर पाण्यात ते रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून घेऊन प्या. हा उपाय केल्याने उन्हाळी लागण्याचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल.
याशिवाय टरबूज, संत्री, द्राक्षं यासारखी ताजी फळं, काकडी, ताक, लिंबू सरबत, शिकंजी, नारळपाणी, सातुचे पीठ अशा पदार्थांचे आहारातील सेवन वाढवावे. तसेच खूप मसालेदार पदार्थ, तिखट पदार्थ खाणे टाळावे.
गव्हाच्या पोळ्या म्हणजे अनेक आजारांचं भांडार! एक्सपर्ट सांगतात त्यापेक्षा 'या' चपात्या खा
याशिवाय चहा- कॉफीही कमीतकमी प्रमाणात घ्यावे. पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. असे सगळे उपाय करूनही जर उन्हाळी लागण्याचा त्रास अजिबातच कमी होत नसेल तर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.