चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि खराब लाईफस्टाईल यामुळे पोटात गॅस, जडपणा, ढेकर येणं, छातीत जळजळ, पोट फुगणं यांसारख्या समस्या उद्भवतात. रात्री उशीरा जेवणं, तळलेले-मसालेदार पदार्थ खाणं यामुळे गॅसेसची समस्या उद्भवते. (How To Get Releif from Gas) गॅस झाल्यास वेदना असह्य होतात याशिवाय शरीराच्या विविध भागांमध्येही वेदना होतात यासाठी काही घरगुती उपाय करायला हवेत. आयटी इंडिया एंबेसडर आणि आहारतज्ज्ञ स्वाती बथवाल यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओमध्ये पोटातील गॅसपासून १० मिनिटांत आराम मिळवण्याचे उपाय सांगितले आहेत. (Home remedies For Gastric Problem)
२ पदार्थांनी गॅसेसच्या त्रासावर आराम मिळेल
जर तुम्हाला गॅसेसच्या समस्येवर सुटका हवी असेल तर सगळ्यात आधी १ चमचा कॅस्टर ऑईल घ्या थोडं गरम करा त्यानंतर यात चुटकीभर हिंग घालून व्यवस्थित एकजीव करा. नंतर तेल थंड करून नाभीवर हे तेल लावा. ३० मिनिटांसाठी तसंच ठेवा.
हा उपाय कोणीही करू शकतो. जर तुमच्या घरात लहान मुल असेल आणि त्यालाही गॅसची समस्या असेल तर हा उपाय करू शकता. याव्यतिरिक्त वयस्कर लोकांनीही हा उपाय केल्यास तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.
हिंग आणि कॅस्टर ऑईल नाभीवर लावल्यानं काय होतं?
हिंग आणि कॅस्टर ऑईल गॅसची समस्या कमी करते. यामुळे ब्लॉटींगची समस्या कमी होते. ज्यामुळे एसिडिटीसुद्धा कमी होते, ओठ फाटण्याची समस्याही कमी होते. कॅस्टर ऑईल आणि हिंग तुमच्या पोटासाठी गुणकारी ठरू शकते. यामुळे ब्लॉटींगची समस्या टाळता येते. कॅस्टर ऑईल स्किन आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. सतत होणारी गॅसेसची समस्या टाळण्यासाठी अन्नाचा प्रत्येक घास किमान ३२ वेळा चावून खा.
लाळ अन्नामध्ये नीट मिसळली की पचन सुलभ होते आणि गॅस होत नाही. जेवताना मध्येच खूप पाणी पिऊ नका. जेवणापूर्वी अर्धातास किंवा जेवणानंतर ४५ मिनिटांनी कोमट पाणी प्या. जेवताना पोटावर ताण येईल असे घट्ट कपडे घालणं टाळा ज्यामुळे इतर समस्याही उद्भवू शकतात.
