सकाळच्यावेळी म्हणजेच झोपेतून उठल्यानतंर अनेकांना सतत शिंका येण्याचा त्रास होतो. याला वैद्यकिय भाषेत एलर्जिक राहिनायटिस किंवा सकाळची एलर्जी असंही म्हणतात. काहीजणांच्या नाकातून सतत पाणी वाहत राहतं तर काहीचं डोकं दुखतं. सर्दी झाल्यानंतर भूक, तहान या संवेदनाही जाणवत नाही इतका डोकेदुखी किंवा नाक चोंदण्याचा त्रास होतो. धूळ, धुळीचे कण, पाळीव प्राण्यांचे केस किंवा परागकण यांचा नाकाशी झालेला संपर्क याचे कारण असतो. शिंका येण्याची समस्या टाळण्यासाठी आपला बेड अत्यंत स्वच्छ, साफ ठेवणं महत्वाचं असतं. (How To Get Instant Relief From Frequent Sneezing)
1) या समस्येवर प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्या बेडरूमची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. सर्वप्रथम उशीचे आणि गादीचे कव्हर, चादर नियमितपणे धुवा. शक्य असल्यास गरम पाण्यानं धुवा. जेणेकरून धुळीचे कण नष्ट होतील. एलर्जीप्रुफ कव्हर्स वापरणं हा चांगला पर्याय आहे.
2) गरम पाण्याची वाफ सतत घेत राहा. गरम पाण्याची वाफ घेतल्यास नाकातील अडथळे दूर होतात आणि एलर्जन्स बाहेर पडण्यास मदत होते. दररोज सकाळी कोमट खारट पाण्यानं नाक धुणे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. जो नाकातील कण काढून टाकतो.
3) हवा स्वच्छ ठेवण्यासाठी खोलित ह्युमिडीफायर असल्यास त्याची नियमित स्वच्छता करा.
एअर प्युरिफायर वापरा जे हवेतील एलर्जीचे कण फिल्टर करतात. पाळीव प्राणी तुमच्या बेडरूमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्या.
4) सकाळी उठल्यानंतर थेट हवेच्या संपर्कात येऊ नका. खिडक्या उघडण्यापूर्वी थोडं थांबा. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याची वाफ घेतल्यास नाकातील जमा झालेला कफ आणि एलर्जन्स बाहेर पडण्यास मदत होते. नियमितपणे योग किंवा प्राणायाम केल्यास श्वासोच्छवास आणि प्रतिकारकशक्ती सुधारते. कोमट पाण्यात थोडं मीठ घालून नाक धुवून घ्या किंवा नेती क्रिया करा यामुळे नाकातील एलर्जन्स बाहेर पडतात.
5) याव्यतिरिक्त आपल्या आहारात व्हिटामीन सी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. जर हे उपाय करूनही त्रास कमी होत नसेल आणि शिंकांमुळे रोजची काम प्रभावित होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
