Join us

एकच भाजी किती वेळा गरम करुन खाणे योग्य? शिळे अन्न सतत गरम करुन खाता तर पाहा काय नुकसान होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2025 12:24 IST

How many times is it okay to reheat the same vegetable and eat it? See what harm happens if you keep reheating stale food : शिळी भाजी सारखी गरम करुन खाणे ठरेल वाईट.

भारतात अन्न हे पूर्णब्रम्ह मानले जाते. त्यामुळे अन्नाची नासाडी करु नये, अन्न वाया जाऊ देऊ नये असे नियम घरोघरी असतात. उरलेले शिळे अन्नही आपण आवडीने पुन्हा खातो. मात्र काही वेळा अन्न संपवण्याच्या नादात आपण आरोग्याची काळजी घ्यायला विसरतो. शिळे खाऊ नये हे तर आपल्याला माहिती आहे. (How many times is it okay to reheat the same vegetable and eat it? See what harm happens if you keep reheating stale food)रात्रीची उरलेली भाजी दुसऱ्या दिवशी आणि अगदी पुढचे तीन दिवसही आपण खातो. ती संपेपर्यंत गरम करुन खातात. फ्रिजमध्ये ठेवली की खराब होत नाही. पण असे करणे खरंच योग्य आहे का?   

शिळे अन्न पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. विशेषतः जीवनसत्त्व ए, बी आणि सी सारखी विरघळणारी सत्वे गरम केल्यावर नष्ट होतात. त्यामुळे त्या अन्नातून शरीराला अपेक्षित पोषण मिळत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर, ६० अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानावर अनेक सूक्ष्मजीव मरतात, पण काही उष्णतेस प्रतिरोधक बॅक्टेरिया गरम केल्यावरही टिकतात. जर अन्न योग्य प्रकारे थंड आणि गरम केले गेले नाही, तर हे बॅक्टेरिया पुन्हा वाढू शकतात आणि फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो.

उरलेली भाजी फ्रिजमध्ये ठेवली तरी ती पूर्ण थंड झाल्यानंतरच ठेवावी. गरम भाजी थेट फ्रिजमध्ये ठेवल्यास ओलावा तयार होतो आणि त्यामुळे coli, Salmonella सारखे बॅक्टेरिया वाढू शकतात. विशेषतः पालेभाज्या, फुलकोबी, बटाटे आणि भात यांसारखे पदार्थ पुन्हा गरम करु नयेत, कारण त्यात नायट्रेट्स आणि अॅक्रिलामाइड्स नावाचे घटक तयार होतात. हे घटक शरीरात दीर्घकाळ राहिल्यास पचनसंस्था आणि यकृतावर वाईट परिणाम करु शकतात. तसेच वारंवार गरम केल्याने तेलात ऑक्सिडेशन होते, ज्यामुळे ट्रान्स फॅट्स निर्माण होतात. हे फॅट्स हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढवण्यास कारणीभूत ठरु शकतात. त्यामुळे वारंवार गरम केलेली भाजी शरीरासाठी हानिकारक ठरते. शिळे अन्न वाया जाऊ नये ही गोष्ट अगदी बरोबर असली तरी त्यालाही मर्यादा आहेत. एखादा पदार्थ जास्त दिवस तसाच असेल तर तो खाऊ नये. ताजे, गरमागरम असेच पदार्थ खावेत.    

English
हिंदी सारांश
Web Title : Reheating Vegetables: How Many Times is Too Much? Health Risks

Web Summary : Reheating food repeatedly diminishes nutrients and fosters bacteria growth, risking food poisoning. Certain foods, like spinach and rice, pose greater dangers. Repeated heating also creates harmful trans fats, increasing heart risks. Eat fresh food for better health.
टॅग्स : हेल्थ टिप्सअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआरोग्य