Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डायबिटिस आहे म्हणून राेज चालायला जाता? थांबा, पाहा कधी आणि किती वेळ चाललं तरच होतो फायदा

डायबिटिस आहे म्हणून राेज चालायला जाता? थांबा, पाहा कधी आणि किती वेळ चाललं तरच होतो फायदा

Walking Tips for Diabetes Patients : डायबिटीसच्या रूग्णांनी रोज किती वेळ वॉक करावा? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:34 IST2025-06-03T13:14:04+5:302025-06-03T19:34:01+5:30

Walking Tips for Diabetes Patients : डायबिटीसच्या रूग्णांनी रोज किती वेळ वॉक करावा? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

How long and how should diabetic patients walk? Learn the right method and time... | डायबिटिस आहे म्हणून राेज चालायला जाता? थांबा, पाहा कधी आणि किती वेळ चाललं तरच होतो फायदा

डायबिटिस आहे म्हणून राेज चालायला जाता? थांबा, पाहा कधी आणि किती वेळ चाललं तरच होतो फायदा

Walking Tips for Diabetes Patients : डायबिटीस (Diabetes) म्हणजेच मधुमेह हा एक असा आजार आहे जो कधीही पूर्णपणे बरा होत नाही. कारण यावर अजूनही काही ठोस उपाय सापडलेला नाही. त्यामुळे हा आजार केवळ कंट्रोल केला जाऊ शकतो. एकदा जर डायबिटीस झाला तर शरीरात ब्लड शुगर लेव्हल अनियंत्रित होते. अशात ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यासाठी औषधं आणि डाएटसोबत शरीराची हालचाल करणंही खूप महत्वाचं ठरतं. अशात डायबिटीसच्या रूग्णांनी रोज किती वेळ वॉक करावा? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

दिल्लीतील प्रसिद्ध डायबिटीस डॉक्टर डॉ. हिमिका चावला यांनी Indiatv.in ला सांगितलं की, वॉकिंग डायबिटीसच्या रूग्णांसाठी सगळ्यात सोपा आणि सरळ व्यायाम आहे. खाण्या-पिण्यात बदल करण्यासोबतच शारीरिक हालचाल त्यांच्यासाठी खूप महत्वाची ठरते. पण वॉकिंग योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं केली गेली पाहिजे. तेव्हाच याचा फायदा मिळू शकतो.

रोज किती वेळ चालावं?

डायबिटीसच्या रूग्णांनी रोज किमान 30 ते 45 मिनिटं ब्रिस्क वॉक (Brisk Walk) म्हणजे भरंभरं चाललं पाहिजे. अशी वॉकिंग तुम्ही एकदाच करू शकता किंवा 10-10 मिनिटांमध्ये विभागून करू शकता. आठवड्यातून किमान 5 दिवस असं चालणं बेस्ट मानलं जातं. पायी चालल्यानं ब्लड शुगर नियंत्रित होते. तसेच इन्सुलिनची सेन्सिटिविटी सुद्धा वाढते आणि हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होतो.

पायी चालण्याची योग्य पद्धत

डायबिटीसच्या रूग्णांसाठी जेवण झाल्यानंतर चालणं अधिक फायदेशीर ठरतं. खासकरून रात्रीच्या जेवणानंतर 15 ते 30 मिनिटं हलकं चालणं ब्लड शुगर वेगानं वाढण्यापासून रोखतं. मात्र, जेवण झाल्यावर लगेच चालू नका. जेवण झाल्यावर किमान अर्ध्या तासानंतर पायी चालावं. सकाळी उपाशीपोटी चालणं सुद्धा फायदेशीर ठरतं. पण जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल किंवा ब्लड शुगर लेव्हल आधीच कमी असेल तर सकाळी पायी चालण्याआधी हलका नाश्ता नक्की करा.

वॉकिंग कसं करावं?

ब्रिस्क वॉक म्हणजे ज्यात तुम्हाला सामान्यापेक्षा अधिक वेगानं चालावं लागतं. पण धावायचं नाहीये. यावेळी पाठ सरळ ठेवा, हात सामान्यपणे मागे-पुढे हलवा आणि श्वासाची गति संतुलित ठेवा. वॉकिंग करताना शूज आरामदायक असायला हवेत.

डायबिटीस कंट्रोल ठेवण्यासाठी पायी चालणं एक प्रभावी व्यायाम आहे. पण यासाठी वेळ, नियमितता आणि योग्य टेक्निक महत्वाची ठरते. पायी चालल्यानं ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते आणि एकंदर आरोग्यही चांगलं राहतं.

Web Title: How long and how should diabetic patients walk? Learn the right method and time...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.