Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात हिट स्ट्रोकने जाऊ शकतो जीव, उष्माघात टाळा- पाहा लक्षणं आणि उपाय

उन्हाळ्यात हिट स्ट्रोकने जाऊ शकतो जीव, उष्माघात टाळा- पाहा लक्षणं आणि उपाय

Heat Stroke : हीट स्ट्रोक कसा घातक ठरतो, त्याची लक्षणं कोणती आणि त्यापासून बचाव कसा करावा हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:37 IST2026-03-22T09:55:36+5:302026-03-23T12:37:02+5:30

Heat Stroke : हीट स्ट्रोक कसा घातक ठरतो, त्याची लक्षणं कोणती आणि त्यापासून बचाव कसा करावा हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे.

How heat stroke can cause death know treatment and symptoms | उन्हाळ्यात हिट स्ट्रोकने जाऊ शकतो जीव, उष्माघात टाळा- पाहा लक्षणं आणि उपाय

उन्हाळ्यात हिट स्ट्रोकने जाऊ शकतो जीव, उष्माघात टाळा- पाहा लक्षणं आणि उपाय

Heat Stroke : उन्हाळ्याचा सीझन अनेकांसाठी कडक ऊन आणि उष्णता घेऊन येतो, पण कधी कधी तो जीवघेणाही ठरू शकतो. शरीराचे तापमान खूप वाढले की त्याला हीट स्ट्रोक म्हणतात. ही एक गंभीर स्थिती आहे ज्यात शरीराचे तापमान अचानक खूप वाढतं आणि वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे हीट स्ट्रोक कसा घातक ठरतो, त्याची लक्षणं कोणती आणि त्यापासून बचाव कसा करावा हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे.

हीट स्ट्रोकमुळे मृत्यू कसा होतो?

जेव्हा शरीराचं तापमान खूप वेगाने वाढते तेव्हा शरीराला स्वतःला थंड ठेवणं कठीण होतं. अशा वेळी सर्वप्रथम मेंदू, हृदय आणि किडनी यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होतो. अतिरिक्त उष्णतेमुळे मेंदूच्या पेशींना नुकसान होऊ शकतं. त्यामुळे गोंधळ, झटके येणे, कोमा किंवा मानसिक नियंत्रण हरवणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. शरीर थंड ठेवण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करू लागते, त्यामुळे हृदयाचे ठोके जलद आणि कमकुवत होऊ शकतात.

जर शरीराचं तापमान दीर्घकाळ खूप जास्त राहिले आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर शरीरातील महत्त्वाचे अवयव हळूहळू काम करणे बंद करतात. त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडतं आणि शेवटी मृत्यू होण्याचा धोका निर्माण होतो.

हीट स्ट्रोकची लक्षणे

हीट स्ट्रोकचा मुख्य लक्षण म्हणजे शरीर खूप गरम होणे. याशिवाय खालील लक्षणे दिसू शकतात:

मानसिक बदल, गोंधळ किंवा अस्वस्थता

अस्पष्ट बोलणे

झटके येणे किंवा कोमा

त्वचा कधी गरम व कोरडी तर कधी जास्त घाम येणे

पोटदुखी किंवा मळमळ

त्वचा लाल होणे आणि हृदयाचे ठोके वाढणे

डोकेदुखी आणि दम लागणे

अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांची मदत घ्यावी.

हीट स्ट्रोकपासून बचाव कसा करावा?

सैल आणि हलके कपडे घाला.

उन्हापासून संरक्षणासाठी टोपी, सनग्लासेस आणि सनस्क्रीन वापरा.

दिवसभर पुरेसे पाणी प्या.

उभ्या वाहनात कोणालाही एकटे सोडू नका.

दिवसातील सर्वाधिक उष्ण वेळेत जड शारीरिक काम टाळा.

हळूहळू शरीराला गरम हवामानाशी जुळवून घ्या.

Web Title : हीट स्ट्रोक: लक्षण, बचाव और यह क्यों घातक हो सकता है

Web Summary : हीट स्ट्रोक में शरीर का तापमान तेज़ी से बढ़ता है। भ्रम, तेज़ धड़कन और अंग विफलता इसके लक्षण हैं। बचाव के लिए हाइड्रेटेड रहें, हल्के कपड़े पहनें और गर्मी में ज़्यादा काम न करें। लक्षण दिखने पर तुरंत डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Heat Stroke: Symptoms, Prevention, and Why It Can Be Fatal

Web Summary : Heat stroke, a dangerous condition, occurs when body temperature rises rapidly. Symptoms include confusion, rapid heartbeat, and potential organ failure. Prevention involves staying hydrated, wearing light clothing, and avoiding strenuous activity during peak heat. Seek immediate medical help if symptoms appear.