आजच्या काळात आजारांचं एक मोठं कारण चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली आहे. आता ऑनलाईन फूड ऑर्डर केलं जात आहे. लोक फोन स्क्रोल करत जेवतात. यामुळे अन्नाचं सेवन योग्य पद्धतीने होत नाही. अनेक लोक खूप घाईत जेवतात. ही एक सवय बनत चालली आहे, पण हळूहळू यामुळे आरोग्य बिघडत आहे.
डॉक्टरांच्या मते, खराब आहारासोबतच आता अनेक लोकांमध्ये आजाराचं कारण रोजच्या या सवयी देखील आहेत. दुसरीकडे आता लोक फास्ट फूड देखील जास्त खात आहेत. जेवणातील फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण कमी झालं आहे. याचा परिणाम आतड्यांच्या आरोग्यावर होत आहे. आतड्यांचे आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण म्हणजे, जेव्हा लोक फोन पाहून जेवतात तेव्हा काही लोक अन्न योग्य प्रकारे चावत नाहीत. यामुळे अन्नाचे पचन करण्यासाठी आतड्यांना जास्त काम करावं लागतं.
आरोग्य बिघडल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या
आतड्यांचे आरोग्य बिघडल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यामुळे 'मायक्रोबायोम'मध्ये असंतुलन निर्माण होते, ज्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्तीपासून ते झोपेपर्यंत होतो. चिंतेची बाब म्हणजे सोशल मीडियाच्या या काळात अनेक लोक फोन स्क्रोल करत जेवत आहेत. यामुळे त्यांना चांगलं वाटतं खरं पण पचनशक्ती बिघडत आहे.
'पॅसिफिक वनहेल्थ'मधील प्रिव्हेंटिव्ह वेलनेस आणि मेटाबॉलिक डिसीज विभागाचे प्रमुख डॉ. ऐजाज इल्मी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, सुमारे ३९ टक्के शहरी लोक कमी फायबर असलेला आहार घेतात, तर ३६ टक्क्यांहून अधिक लोक जास्त साखर असलेल्या पदार्थांचे सेवन करतात.
खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आतड्यांचं नुकसान
या सवयी आता कधीतरी होणाऱ्या नसून दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. खाण्यापिण्याच्या या सवयींमुळे आतड्यांचं नुकसान होतं. यामुळे शरीरात जळजळ (सूज) वाढते आणि रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. परिणामी अनेक लोकांना पोट फुगणं, दुपारच्या वेळी थकवा येणं आणि रात्री अस्वस्थ वाटणं अशा समस्या जाणवतात. लोक याला सामान्य त्रास समजतात, मात्र तज्ज्ञ याला आतड्यांच्या बिघडत चाललेल्या आरोग्याचे संकेत मानतात.
आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
फोन न पाहता शांतपणे जेवण करा.
तुमच्या आहारात डाळ, फळं आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश करा.
साखरयुक्त किंवा गोड पदार्थ कमी खा.
दररोज व्यायाम करा.
