Kidney Test: शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे आपल्या किडनी. किडनींद्वारे शरीरातील घाण, टॉक्सिन्स आणि अपशिष्ट पदार्थ बाहेर काढण्याचे महत्त्वाचे काम केले जातात. शरीरात दोन किडनी असतात. एक किडनी खराब झाली तरीही माणूस जगू शकतो आणि सामान्य आयुष्य जगू शकतो, पण किडनी निरोगी ठेवण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली आवश्यक आहे. जर किडनीमध्ये काही समस्या जाणवत असेल, तर काही सोप्या तपासण्यांद्वारे किडनीची स्थिती समजू शकते.
किडनी ठीक आहे की नाही, कशी तपासावी?
किडनी व्यवस्थित काम करते आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी दोन महत्त्वाच्या आणि सोप्या टेस्ट केल्या जातात.
क्रिएटिनिन टेस्ट
या टेस्टच्या माध्यमातून रक्तातील क्रिएटिनिन पातळी मोजली जाते. यावरून किडनी नीट फिल्टरिंग करते आहे की नाही, हे कळते.
युरीन रूटीन टेस्ट
मूत्रातील प्रोटीन, शुगर, इन्फेक्शन इत्यादी तपासले जाते. यावरून किडनीत काही इन्फेक्शन किंवा लीकेज (प्रोटीन जाणे) आहे का ते समजते. या दोन बेसिक टेस्ट किडनीच्या आरोग्याची प्राथमिक माहिती देतात.
किडनीसाठी केल्या जाणाऱ्या इतर टेस्ट
जर या प्राथमिक टेस्टमध्ये काही गडबड दिसली, तर डॉक्टर पुढील तपासण्यांचा सल्ला देतात. एक्सटेंडेड किडनी फंक्शन टेस्ट आणि अल्ट्रासाउंड ज्याद्वारे किडनीचा आकार, ब्लॉकेज किंवा सूज याची माहिती मिळते. वेळोवेळी किडनी तपासून घेतल्याने किडनीचे आजार सुरुवातीला लक्षात येतात आणि उपचार वेळेत करता येतात.
किडनी खराब होण्याची लक्षणे
किडनी डॅमेज झाल्यानंतर शरीर उशिरा लक्षणे दाखवू लागते. सामान्य लक्षणे खालील दिसू शकतात.
खूप जास्त थकवा व कमजोरी जाणवणे
रात्री वारंवार लघवी लागणे किंवा उलट खूप कमी लघवी होणे
लघवीचा रंग बदलणे, दुर्गंधी येणे
डोळ्यांभोवती, पाय, टाचे, हात सुजणे
त्वचा कोरडी होणे आणि खाज येणे
झोप न लागणे किंवा वारंवार जाग येणे
श्वास घेण्यास त्रास होणे
स्नायूंमध्ये आकडी येणे
पोट बिघडणे, उलटी, मळमळ
ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत, कारण किडनी आजार योग्य वेळी लक्षात आल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवता येते.
