Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लघवी रोखून धरण्याची सवय आहे? ४ धोके, युरिन इन्फेक्शन ते किडनीचे आजार होण्याची शक्यता

लघवी रोखून धरण्याची सवय आहे? ४ धोके, युरिन इन्फेक्शन ते किडनीचे आजार होण्याची शक्यता

Holding Your Pee: Is It Safe :सर्वसामान्यतः दर तासाला जर जवळपास ५० मिली लघवी बनत असेल तर संपूर्ण मूत्राशय भरायला ८ ते १० तास लागतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 03:15 PM2023-04-11T15:15:09+5:302023-04-11T18:43:53+5:30

Holding Your Pee: Is It Safe :सर्वसामान्यतः दर तासाला जर जवळपास ५० मिली लघवी बनत असेल तर संपूर्ण मूत्राशय भरायला ८ ते १० तास लागतात. 

Holding Your Pee Is It Safe : Is it safe to hold your pee Five possible complications | लघवी रोखून धरण्याची सवय आहे? ४ धोके, युरिन इन्फेक्शन ते किडनीचे आजार होण्याची शक्यता

लघवी रोखून धरण्याची सवय आहे? ४ धोके, युरिन इन्फेक्शन ते किडनीचे आजार होण्याची शक्यता

आपल्या घराव्यतिरिक्त इतर ठिकाणी शौचालयास जाणं लोक टाळतात. सार्वजनिक ठिकाणी असताना किंवा घरातही कामात असताना लघवी रोखून ठेवली जाते. मूत्राशय ताणले जाऊ शकते त्यामुळे त्यामध्ये जसजशी लघवी भरत जाते तसतसे ते विस्तार पावते.  (Holding Your Pee: Is It Safe) मूत्राशयावर अधिक जास्त ताण न येता अधिक लघवी धरून ठेवण्याची क्षमता त्यामध्ये असते. वयस्कर व्यक्तीच्या निरोगी मुत्राशयामध्ये जवळपास ४०० ते ५०० मिली लघवी धरून ठेवली जाऊ शकते. डॉ. श्याम वर्मा (कन्सल्टन्ट, युरॉलॉजी अँड रेनल ट्रान्सप्लान्ट सर्जन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई) ( Is it safe to hold your pee  Five possible complications)

सर्वसामान्यतः दर तासाला जर जवळपास ५० मिली लघवी बनत असेल तर संपूर्ण मूत्राशय भरायला ८ ते १० तास लागतात. जेव्हा १५० मिली लघवी साठते तेव्हा मूत्राशय "भरत असल्याच्या पहिल्या भावनेचा" संदेश शरीराच्या सेंट्रल नर्व्हस सिस्टिमला पाठवला जातो, त्यावेळी लघवी केली गेली पाहिजे, सर्वसाधारणपणे ही क्रिया दर तीन तासांनी झाली पाहिजे.

काहीवेळा काही कारणाने त्याचवेळी लघवी करणे जमत नाही आणि ती थांबवून ठेवावी लागते, तेव्हा "लघवी करून मूत्राशय रिकामी करावे अशी पहिली इच्छा" होते, तुम्हाला कळते की मूत्राशय भरत जात आहे आणि तुम्हाला मूत्राशय रिकामी करावेसे वाटते.  यानंतर सुद्धा जर लघवी केली गेली नाही तर "मूत्राशय रिकामे करावे अशी तीव्र इच्छा" निर्माण होते, लघवी केली पाहिजे असे सतत वाटत राहते. पण काहीवेळा लघवी करण्यासाठी योग्य जागा किंवा वेळ मिळत नाही. कधीतरी अशा स्थितीत अजून काही वेळ लघवी थांबवून ठेवणे हानिकारक नसते पण लघवी करण्याकडे वारंवार दुर्लक्ष करणे शारीरिक समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

लघवी बराच काळ रोखून ठेवल्यास या समस्या होऊ शकतात - 

१) मूत्रमार्गामध्ये संसर्ग: बरेच तास लघवी थांबवून ठेवणे जर रोजच्या रोज होत असेल तर मूत्राशयात लघवी साठून राहत असल्याने तिथे बॅक्टरीयाची वाढ होऊ लागते, मूत्रमार्गामध्ये संसर्ग होऊ लागतो. 

लघवी करताना आग होते, थेंब थेंब लघवी होते? ५ लक्षणे - मुत्राशयाच्या कॅन्सरचा धोका

२) लघवी रोखून धरण्याची सवय लागली तर काही काळानंतर मुत्राशयातील स्नायू कमजोर होतात, लघवीचा ओव्हरफ्लो होण्यावर संयम ठेवणे कठीण होऊन बसते. लघवी धरून ठेवण्याची मुत्राशयाची एक क्षमता असते, त्या क्षमतेपेक्षा जास्त लघवी धरून ठेवावी लागल्यास लघवी बाहेर येते.

३) ८ ते १० तासांपर्यंत लघवी थांबवून ठेवलेली असेल तर त्यानंतर लघवी रोखून धरणे पूर्णपणे अशक्य होऊन बसते आणि अतिशय  तातडीनं लघवी करावी लागू शकते.

ना डाएट- ना जीम; फक्त 5 रिफ्रेशिंग पदार्थ रोज घ्या; झरझर घटेल पोट, कंबरेची वाढलेली चरबी

४)  लघवी रोखून ठेवणे वारंवार आणि खूप काळ केले जात असेल तर लघवी बाहेर पडणे रोखणारा सेफ्टी व्हॉल्व निकामी होतो, यामुळे लघवीचा बॅकफ्लो होतो व किडनीची कार्यक्षमता खालावते.

Web Title: Holding Your Pee Is It Safe : Is it safe to hold your pee Five possible complications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.