lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुम्ही रात्री अंधारातही तासंतास मोबाइल स्क्रीन पाहता? ४ गंभीर आजार होण्याचा धोका, लक्षणांची ही घ्या यादी

तुम्ही रात्री अंधारातही तासंतास मोबाइल स्क्रीन पाहता? ४ गंभीर आजार होण्याचा धोका, लक्षणांची ही घ्या यादी

Here's Why Smartphones Can Hurt Our Eyes and Cause Headaches दिवसा तासंतास फोन पाहिला तरी रात्री फोनकडे डोळे लावून बसता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2023 10:45 AM2023-09-08T10:45:15+5:302023-09-08T10:50:01+5:30

Here's Why Smartphones Can Hurt Our Eyes and Cause Headaches दिवसा तासंतास फोन पाहिला तरी रात्री फोनकडे डोळे लावून बसता का?

Here's Why Smartphones Can Hurt Our Eyes and Cause Headaches | तुम्ही रात्री अंधारातही तासंतास मोबाइल स्क्रीन पाहता? ४ गंभीर आजार होण्याचा धोका, लक्षणांची ही घ्या यादी

तुम्ही रात्री अंधारातही तासंतास मोबाइल स्क्रीन पाहता? ४ गंभीर आजार होण्याचा धोका, लक्षणांची ही घ्या यादी

आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. जितके मोबाईल फोन वापरण्याचे फायदे आहेत, तितकेच तोटे देखील आहेत. अनेकांना मोबाईल फोनची इतकी सवय लागली आहे, की त्यांना मोबाईल फोन शिवाय जमतच नाही. लोकं मोबाईल फोनचा वापर फक्त लांब असलेल्या व्यक्तींसोबत बोलण्यासाठी करत नसून, जेवणाची ऑर्डर, वस्तूंची ऑर्डर आणि महत्त्वाचे म्हणेज सोशल मिडिया यांसारख्या गोष्टींसाठी करत आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा यासह मोबाईल फोनही आजच्या काळाची गरज बनली आहे.

मात्र, मोबाईल फोनचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मुख्य म्हणजे रात्रीच्या वेळेस जास्त वापर केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. अनेकांना रात्रीच्या वेळेस मोबाईल फोन चाळत बसण्याची सवय लागली आहे. मात्र, ही सवय आरोग्याच्या दृष्टीने घातक का ठरत आहे, याची माहिती आकाश हेल्थकेअरचे वरिष्ठ सल्लागार डॉ.मधुकर भारद्वाज यांनी दिली आहे(Here's Why Smartphones Can Hurt Our Eyes and Cause Headaches).

डोळ्यांसाठी नुकसानदायक

रात्रीच्या वेळेस मोबाईलचा अतिवापर डोळ्यांसाठी नुकसानदायक ठरू शकते. डोळा हा आपल्या शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे. मोबाईलचा निळा प्रकाश डोळ्यांसाठी घातक ठरते. जेव्हा आपण मोबाईल फोन वापरतो, तेव्हा डोळे कमी मिचकावतो. ब्ल्यू लाईटच्या एक्सपोजरमुळे रेटिनाच्या संवेदनशील पेशींचे नुकसान होते. यामुळे डोळ्यांमध्ये वेदना, कोरडेपणा आणि खाज सुटण्याची समस्या निर्माण होते.

दिवसभर पित्ताचा त्रास-एनर्जी कमी? मग भल्या सकाळी नाश्त्याला खाणं टाळा ३ गोष्टी

मधुमेह

रात्री अधिक मोबाईल फोन वापरल्याने मधुमेह होऊ शकते. मधुमेह हा वाईट जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. जर आपण रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन चाळत बसलात तर, ब्लड शुगरची पातळी अनियंत्रित होऊ शकते. ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.

ब्रेन हेल्थवर परिणाम

रात्रीच्या वेळेस जर आपण जास्त वेळ मोबाईल फोनचा वापर करत असाल तर, याचा थेट परिणाम ब्रेनवरही होऊ शकते. कारण जेव्हा आपण मोबाईल फोन वापरतो, तेव्हा मेंदू सक्रीय मोडवर असते. झोपल्यानंतर विश्रांतीच्या स्थितीत जाते. जर मेंदूला आराम मिळाला नाही तर, निश्चित याचा थेट परिणाम ब्रेन हेल्थवरही होऊ शकते. याशिवाय रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरल्याने सकाळी फ्रेश वाटत नाही. संपूर्ण दिवस आळसात जातो.

गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये? डायबिटीस होण्याचा धोका त्याने वाढतो का?

स्ट्रेस आणि डोकेदुखी

रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरल्याने मेलाटोनिन हार्मोनची पातळी कमी होते. ज्यामुळे आपला स्ट्रेस वाढू शकतो. याशिवाय मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळेही डोकेदुखी होऊ शकते.

Web Title: Here's Why Smartphones Can Hurt Our Eyes and Cause Headaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.