lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Heart attack symptoms : छातीचं दुखणं हार्ट अटॅकचे लक्षण की गॅस झालाय, कसं ओळखाल? डॉक्टरांनी सांगितला 'या' दोघांमधील फरक 

Heart attack symptoms : छातीचं दुखणं हार्ट अटॅकचे लक्षण की गॅस झालाय, कसं ओळखाल? डॉक्टरांनी सांगितला 'या' दोघांमधील फरक 

Heart attack symptoms : ठराविक छातीत दुखणे याला एनजाइना असेही म्हणतात. जेव्हा पूर्णपणे ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या स्नायूपर्यंत पोहोचत नाही, तेव्हा छातीत अस्वस्थतेची भावना येते आणि छातीत वेदना होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 01:16 PM2022-01-12T13:16:21+5:302022-01-12T13:32:20+5:30

Heart attack symptoms : ठराविक छातीत दुखणे याला एनजाइना असेही म्हणतात. जेव्हा पूर्णपणे ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या स्नायूपर्यंत पोहोचत नाही, तेव्हा छातीत अस्वस्थतेची भावना येते आणि छातीत वेदना होतात.

Heart attack symptoms : How to differentiate between chest pain and stomach gas expert tips | Heart attack symptoms : छातीचं दुखणं हार्ट अटॅकचे लक्षण की गॅस झालाय, कसं ओळखाल? डॉक्टरांनी सांगितला 'या' दोघांमधील फरक 

Heart attack symptoms : छातीचं दुखणं हार्ट अटॅकचे लक्षण की गॅस झालाय, कसं ओळखाल? डॉक्टरांनी सांगितला 'या' दोघांमधील फरक 

अनेकदा लोक छातीत दुखणं हे हृदयविकाराचे संकेत आहे की गॅस हे ओळखण्यात चूक करतात. छातीत दुखणे किंवा जळजळ होणे याकडे लोक गॅसचे दुखणे म्हणून दुर्लक्ष करतात. अशा स्थितीत हृदयविकाराचा धोका वाढतो. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी, जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत कार्डिओलॉजीचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अवधेश शर्मा यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली. (How to differentiate between chest pain and stomach gas expert tips )

त्यांच्यामते जर एखाद्या रुग्णाच्या छातीत 15-20 मिनिटं तीव्रतेनं दुखत असेल. तर त्याने ताबडतोब हृदयरोगतज्ज्ञांना दाखवावे. प्रत्येक वेळी छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉ.अवधेश शर्मा यांनी छातीत दुखणे हे हृदयविकाराचा झटका किंवा गॅसचे लक्षण आहे की नाही हे कसे ओळखावे याबाबत सविस्तर माहिती दिली. (Heart attack  symptoms)

छाती दुखण्याचे प्रकार

डॉ. अवधेश शर्मा म्हणतात की छातीत दुखणे हे दोन भागात विभागून पाहिले जाऊ शकते: टिपिकल चेस्ट पेन आणि अॅटिपिकल चेस्ट पेन. या दोन्ही प्रकारच्या वेदनांची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात.

टिपिकल चेस्ट पेन

ठराविक छातीत दुखणे याला एनजाइना असेही म्हणतात. जेव्हा पूर्णपणे ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या स्नायूपर्यंत पोहोचत नाही, तेव्हा छातीत अस्वस्थतेची भावना येते आणि छातीत वेदना होतात. तुम्हाला खांदा, मान, जबडा इत्यादींमध्ये अशीच अस्वस्थता असू शकते. एनजाइना हे कोरोनरी धमनी रोगाचे लक्षण आहे. कोरोनरी धमनी रोग होतो तेव्हा एक किंवा अधिक रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो. कोरोनरी मायक्रोव्हस्कुलर रोगात देखील छातीत दुखते. छातीत दुखणे हे सामान्यतः हृदयविकाराचे लक्षण मानले जाते. त्यामुळे छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये.

टिपिकल चेस्ट पेनची लक्षणं

छातीच्या मध्यभागी तीव्र वेदना

घाम येणे

आपला जीव जाईल असे रुग्णाला वाटते

वेदना डाव्या हाताच्या बोटापर्यंत, जबड्यापर्यंत पसरते.

चालताना तीव्र वेदना

श्वास घेण्यात अडचण

मळमळ उलट्या

श्वासोच्छवासाची समस्या

चक्कर येणे

थकवा, हार्ट अटॅक

अॅटिपिकल चेस्ट पेन

अॅटिपिकल चेस्ट पेन हे टिपिकल चेस्ट पेनपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. अशा छातीत दुखण्याला  सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात. असे रुग्ण छातीत दुखण्याकडे गॅस किंवा कमकुवतपणा म्हणून दुर्लक्ष करतात. हळूहळू त्रास वाढला की मग तो डॉक्टरांशी बोलतात. रुग्णाला गॅसची समस्या आहे की हृदयाची समस्या आहे हे पाहण्यासाठी डॉक्टर ईसीजी करतात.

छातीतील वेदना ओळखणे सहसा कठीण असते. छातीत दुखणे जसे सामान्य असते तर कधी गंभीर असते. याला सायलेंट हार्ट अटॅक असेही म्हणतात. छातीच्या वेदनांमध्ये, रुग्णाला तीव्रतेनं वेदना जाणवत नाही परंतु तरीही अटॅक येतो. सामान्य लक्षणांपेक्षा अॅटिपिकल लक्षणे अधिक धोकादायक असतात. सहसा खालील लक्षणे दिसतात.

अशा रुग्णांना छातीत दुखणार नाही, पण गॅस तयार होईल. त्यांच्या पोटात जडपणा येईल. आंबट ढेकर येतील. अपचन होईल. पोटात एक विचित्र खळबळ होईल. पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता किंवा जळजळ जाणवते. ही लक्षणे नाभीच्या रिब्सच्या वरच्या भागावर जाणवतात. असे काही रुग्ण आहेत ज्यांना फक्त श्वास घेण्यास त्रास होतो

वरील लक्षणे कोणत्याही क्षणी उद्भवू शकतात आणि 15-20 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकतात. हे हृदयाशी संबंधित नसलेल्या समस्यांमुळे देखील असू शकते. म्हणून, जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील तर विलंब न करता डॉक्टरांशी बोला. ऍटिपिकलमध्ये, रुग्ण गॅसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. रोज गॅसचा त्रास असेल तर औषधाने बरा होतो. परंतु हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये छातीत जळजळ, अपचन यांचा समावेश असू शकतो. अनेकदा गॅसच्या गोळ्या घेऊनही बरं वाटत नाही. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये अशी लक्षणे अधिक धोकादायक असतात. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

एटिपिकल चेस्ट पेनची लक्षणं कोणत्या व्यक्तींमध्ये जास्त दिसतात?

ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांमध्ये छातीत वेदना होण्याची अधिक शक्यता असते. हे छातीत दुखणे कमकुवत प्रतिकारशक्तीमध्ये अधिक दिसून येते. मधुमेह असलेल्या रुग्णांना छातीत वेदना होण्याची शक्यता जास्त असते. तर त्याच वेळी कर्करोगासारख्या आजारांमध्ये देखील छातीत वेदना होतात. हे सर्व गंभीर आजार आहेत, ज्यामध्ये व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमकुवत होते.

वृद्धांच्या वाढत्या वयामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि त्यांच्यात आजारही वाढतात. यावेळी हृदयाचे स्नायू देखील आकुंचन पावू लागतात. त्यामुळे रक्तप्रवाहावरही परिणाम होतो. तर त्याच वेळी, ज्या महिलांचा रजोनिवृत्तीचा कालावधी झाला आहे किंवा संपला आहे, त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. असामान्य छातीत वेदना वृद्ध आणि महिलांमध्ये देखील दिसून येते.

बचावाचे उपाय

लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटा. डॉक्टर कारणांनुसार समस्येवर उपाय शोधतात. याशिवाय निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून हृदय निरोगी ठेवता येते. आत्तापर्यंत असे दिसून आले आहे की बहुतेक हृदयविकार व्यायामाचा अभाव, बिघडलेला आहार इत्यादी कारणांमुळे होतो.

छातीत दुखणे हे काही प्रकरणांमध्ये सामान्य आहे, परंतु जर वेदना सतत होत असेल, घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, जास्त थकवा येणे, आवाज कर्कश होणे, खोकला येत असेल तर विलंब न करता डॉक्टरांशी बोला.

छातीच्या वेदनांकडे दुर्लक्ष करून हृदयविकाराला आमंत्रण देऊ नका. शक्य तितक्या लवकर डॉक्टरांशी बोला. टिपिकल चेस्ट पेन ओळखणं सोपं असतं. याऊलट अटिपिकल चेस्ट पेन ओळखणं कठीण असतं. 

Web Title: Heart attack symptoms : How to differentiate between chest pain and stomach gas expert tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.