Join us

Health Tips : जीवघेणं ठरू शकतं रात्री सतत झोप मोड होणं; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 13:47 IST

Health Tips : युरोपियन हार्ट जर्नलमध्ये मंगळवारी प्रकाशित करण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार पुरूषांमध्ये या संशोधनाचा खास परिणाम पाहायला मिळाला नाही.

एका अभ्यासात दिसून आलं की ज्या महिला रात्री सतत जागून काम करत असतात. त्यांच्यात कमी वयातच मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. ८००० पुरूष आणि महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आलं की, रात्री सतत झोप मोड होण्याची अनेक कारणं असू शकतात. ही एक मेंदूची नैसर्गिक प्रतिक्रिया असते.  हात- पायांमध्ये अचानक वेदना होणं, ट्रॉमा, श्वास घ्यायला  त्रास होणं अशा प्रकारचा त्रास जाणवल्यास एखाद्या व्यक्तीची झोप पूर्ण होणं कठीण असतं.  त्यामुळे पूर्ण ७ ते ८ तासांची झोप घेता येत नाही. याला unconscious wakefulness  असंही म्हणतात.

११ वर्ष निरिक्षण करण्यात आलं. 

ऑस्ट्रेलियाच्या एडिलेट विद्यापीठाच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या संशोधनात दिसून आलं की, ''ही समस्या सतत होत असेल तर यामागे जास्त रक्तदाबाशिवाय इतर अनेक समस्या असू शकतात. या संशोधनासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीचा आधार घेतला. ज्यात एका रात्रीच्या झोपेदरम्यान स्लीप ट्रॅकर लावले होते. प्रत्येकाला अराउजल बर्डन (arousal burden) अंतर्गत निरिक्षण करण्यास सांगितले. सहभागींनी जवळपास ६ वर्षांपासून ११ वर्षांपर्यंत या प्रक्रियेचे निरिक्षण केले. 

पुरूषांच्या तुलनेत जास्त जगतात महिला

या अभ्यासाचे प्रमुख लेखक, सहाय्यक प्राध्यापक माथियास बॉमर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिसून आले की, महिला पुरूषांच्या तुलनेत रात्री कमी जागतात.  पण हृदयरोगामुळे महिलांमध्येही मृत्यूचा धोका अधिक असतो. ज्या महिला रात्री जास्तवेळ जागतात त्याच्यांत मृत्यूचा धोका जास्त असतो. रात्री  जे लोक चांगली झोप घेतात त्याच्यांत हृदयरोगानं मृत्यूचा धोका ६.७ टक्के कमी असतो. 

युरोपियन हार्ट जर्नलमध्ये मंगळवारी प्रकाशित करण्यात आलेल्या निकषांनुसार पुरूषांमध्ये या संशोधनाचा खास परिणाम पाहायला मिळाला नाही. पुरेशी झोप घेत असलेल्या पुरूषांमध्ये  हृदयरोगानं ९.६ टक्के आणि अन्य कारणांमुळे मृत्यूचा धोका २८ टक्के असतो.  याऊलट पुरेशी झोप  घेत नसलेल्या पुरूषांमथ्ये हृदयरोगानं मृत्यू होण्याचा धोका  १३.४ टक्के आणि इतर कारणांनी मृत्यू होण्याचा धोका ३३.७ टक्के असतो.

तज्ज्ञांच्यामते मृत्यूचा धोका टाळण्यासााठी झोप घेण्याची प्रक्रिया सुधारायला हवी. याव्यतिरिक्त रात्री ध्वनी प्रदुषण कमी करावं, वाढलेलं वजन कमी करणं, फायदेशीर ठरतं. या संशोधनातून समोर आलेल्या निकषांनुसार आजारांचा धोका टाळण्यासाठी व्यक्तीनं पुरेपूर झोप घेणं आवश्यक आहे. Centro Nacional de Investigaciones Cardiovasculares Carlos III चे संशोधन तज्ज्ञ प्रोफेसर बोरजा इबनेज यांनी सांगितले की, हृदयावर अनेक कारणांमुळे विपरित परिणाम होतो. झोप पूर्ण न होणं त्यापैकीच एक आहे. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यसंशोधनतज्ज्ञांचा सल्ला