Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!

Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!

Health Tips: शांत आणि वेदनामुक्त झोप हवीय? मग स्लीपिंग पोझिशन बरोबरच उशीचा वापर करताना फॉलो करा दिलेल्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:49 IST2026-04-07T13:47:40+5:302026-04-07T13:49:11+5:30

Health Tips: शांत आणि वेदनामुक्त झोप हवीय? मग स्लीपिंग पोझिशन बरोबरच उशीचा वापर करताना फॉलो करा दिलेल्या टिप्स!

Health Tips: Suffering from back, neck and shoulder pain? Use this pillow to get rid of the pain forever! | Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!

Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!

दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी शांत झोप गरजेची असते, पण जर सकाळी उठल्यावर तुमचे शरीर आखडलेले किंवा दुखत असेल, तर तुमची झोपण्याची पद्धत कारणीभूत असू शकते. झोपताना डोक्याखाली उशीचा वापर अनेक जण करतात, पण त्याच उशीच्या वापराने अनेक शारीरिक व्याधींपासून सुटका मिळू शकते, कशी ते जाणून घ्या. 

१. पाठ आणि कंबर दुखी (Back & Lower Back Pain)

जर तुम्हाला पाठीच्या वरच्या भागात किंवा कमरेत वेदना होत असतील, तर खालील बदल करा:

कंबर दुखी (Lower Back): उताणे (पाठीवर) झोपा आणि गुडघ्यांच्या खाली एक उशी ठेवा. यामुळे मणक्यावरचा ताण कमी होतो.

पाठीचा वरचा भाग (Upper Back): पाठीवर झोपा आणि पाठीच्या वरच्या भागाखाली (खांद्यांच्या खाली) एक लहान उशी ठेवा.

२. मान आणि खांदे दुखी (Neck & Shoulder Pain)

मान दुखी (Neck Pain): पाठीवर किंवा कुशीवर झोपताना मानेला आधार देईल अशी उशी वापरा (Neck Support). उशी खूप जाड किंवा खूप पातळ नसावी.

खांदे दुखी (Shoulder Pain): ज्या बाजूचा खांदा दुखत नाही, त्या कुशीवर झोपा आणि समोरून एक उशी पोटाशी धरून झोपा (Hug a pillow).

३. सायटिका आणि खुब्यातील वेदना (Sciatica / Hip Pain)

सायटिकाचा त्रास अर्थात कंबर किंवा पायदुखीचा त्रास असलेल्या लोकांसाठी झोपण्याची पद्धत खूप महत्त्वाची असते:

कुशीवर झोपा आणि दोन गुडघ्यांच्या मध्ये एक उशी ठेवा. यामुळे कंबरेचे आणि खुब्याचे हाड एका सरळ रेषेत राहते आणि नसांवरील ताण कमी होतो.

४. इतर समस्यांसाठी टिप्स

डोकेदुखी (Headaches): पाठीवर झोपा आणि गुडघ्याखाली उशी ठेवा. यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

सायनस (Sinus): सायनसचा त्रास असल्यास डोके थोडे उंचावर ठेवून (Elevated sleep) पाठीवर झोपा. यामुळे श्वसनमार्ग मोकळा राहतो.

गुडघे दुखी (Knee Pain): पाठीवर झोपून गुडघ्यांच्या खाली उशी ठेवा, जेणेकरून सांध्यांवर कमीत कमी भार येईल.

एक साधी उशी पण तिचा योग्य वापर केल्यास झोप छान लागेल आणि विविध दुखणी थांबतील, तर मग तुम्ही बदलणार ना झोपण्याची पद्धत?

Web Title : तकिये की शक्ति: सही उपयोग से पीठ, गर्दन और कंधे के दर्द से राहत पाएं

Web Summary : शरीर में दर्द से परेशान हैं? सोते समय रणनीतिक रूप से तकिया लगाने से पीठ, गर्दन, कंधे, कटिस्नायुशूल, साइनस, घुटने के दर्द और सिरदर्द से राहत मिल सकती है। नींद की गुणवत्ता में सुधार करें और परेशानी कम करें।

Web Title : Pillow Power: Relieve Back, Neck, and Shoulder Pain with Proper Use

Web Summary : Suffering from body aches? Strategic pillow placement while sleeping can alleviate back, neck, shoulder, sciatica, sinus, knee pain, and headaches. Improve sleep quality and reduce discomfort.