>आरोग्य > दुखणीखुपणी > Runny nose allergy remedies : सकाळी सकाळी नाक गळतं, डोळे चुरचुरतात? एलर्जी सर्दीवर हे घ्या हमखास उपाय

Runny nose allergy remedies : सकाळी सकाळी नाक गळतं, डोळे चुरचुरतात? एलर्जी सर्दीवर हे घ्या हमखास उपाय

Health Tips Runny nose allergy remedies : अनेकांना सकाळी सकाळी शिंका आल्यानं लवकर जाग येते तर काहींना अंघोळीनंतर खूप शिंका येतात.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 05:57 PM2021-10-24T17:57:27+5:302021-10-24T18:09:56+5:30

Health Tips Runny nose allergy remedies : अनेकांना सकाळी सकाळी शिंका आल्यानं लवकर जाग येते तर काहींना अंघोळीनंतर खूप शिंका येतात.  

Health Tips Runny nose allergy remedies : How to get rid of a runny nose | Runny nose allergy remedies : सकाळी सकाळी नाक गळतं, डोळे चुरचुरतात? एलर्जी सर्दीवर हे घ्या हमखास उपाय

Runny nose allergy remedies : सकाळी सकाळी नाक गळतं, डोळे चुरचुरतात? एलर्जी सर्दीवर हे घ्या हमखास उपाय

Next

नेहमीप्रमाणे  आताही हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे. जसंजसं वातावरणात बदल होतो तसतसं सर्दी, खोकला, तापाची लक्षणं दिसू लागतात. नाक गळणं, डोळे चुरचुरणं, घश्यातील इरिटेशन, खाज येणं ही समस्या अनेकांना उद्भवते. वारंवार अशी समस्या त्रासदायक ठरू शकते. अनेकांना सकाळी सकाळी शिंका आल्यानं लवकर जाग येते तर काहींना अंघोळीनंतर खूप शिंका येतात. त्यामुळे कधी चिडचिड होते तर कधी दिवस खराब जातो.  

एकीकडे आपण वाहत्या नाकासाठी सर्दी किंवा एलर्जीचे औषध घेतो. पण दुसरीकडे घरगुती उपाय देखील शोधतो की ते कमी कसे करावे. नाकातून वाहणारे पाणी अनुनासिक मार्गातील कफच्या निर्मितीमुळे होते आणि ते बरे होण्यासाठी ते स्वच्छ ठेवणे फार महत्वाचे आहे. 

१) भरपूर पाणी प्या

जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा आपण पिण्याचे पाणी कमी करतो, पण हा योग्य मार्ग नाही. एक संशोधन म्हणते की जर शरीर हायड्रेटेड राहिले तर तुमच्या अनुनासिक मार्गातील कफ पातळ होईल आणि यामुळे नाकाची अडचण दूर होईल तसेच नाकातील पाण्याच्या रूपातील सर्व घाण त्वरीत काढून टाकली जाईल. असे न झाल्यास नाकातून  चिकट आणि जाड कफ बाहेर पडेल जो त्रासदायक ठरेल.

२) हर्बल चहा

नाक वाहण्याच्या समस्येमध्ये घसा आणि नाक गरम होत असेल तर ते उत्तम मानले जाते. उष्णता आणि वाफेमुळे, हर्बल चहा तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो.  जळजळ आणि चिडचिड कमी करण्यासाठी तुम्ही चहामध्ये कॅमोमाइल, आले, पेपरमिंट इत्यादी औषधी वनस्पती वापरून पाहू शकता. नॉन-कॅफिनयुक्त हर्बल चहा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.

३) वाफ घ्या

नाक आणि घशाच्या संसर्गासाठी  वाफ घेणे सर्वात फायदेशीर ठरू शकते. 2015 च्या रिसर्चगेट.नेट अभ्यासात असे सुचवले आहे की स्टीम इनहेलेशनमुळे तुमचे सर्दीनं भरलेले नाक एका आठवड्यात बरे होऊ शकतात. स्टीम घेणे चांगले आहे आणि आपण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाफ घेताना पाण्यात निलगिरी तेल किंवा लवंग, इ. घालून वाफ आपण आपल्या सोयीनुसार स्टीम वॉटर बनवू शकता.

४)  गरम पाण्यानं अंघोळ करणं

गरम पाण्यानं अंघोळ केल्याने सर्दी कमी होऊ शकते. ज्यांना सायनसची समस्या आहे आणि ज्यांना सतत सर्दी होते त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम ठरू शकतो. 

५)  नेती पॉट

अनेक संशोधक आणि डॉक्टर वाहणारे नाक थांबवण्यासाठी नेटी पॉट वापरतात. नेतीची भांडी लहान चहाच्या भांड्याच्या आकाराचे कंटेनर आहेत ज्यात खारट द्रावण किंवा खारट पाणी एका नाकपुडीमध्ये ओतले जाते आणि दुसऱ्यामधून बाहेर पडते. तुमचा सायनस लवकर बरा करण्याचा हा सर्वात जलद आणि सुरक्षित मार्ग आहे. पण योग्य पद्धत माहित नसल्यास हा उपाय करू नका.

या पाच पद्धती तुम्हाला सर्दीपासून आराम मिळण्यासाठी मदत करू शकतात. याशिवाय एका संशोधनात असेही म्हटले आहे की मिरचीमध्ये असलेले कॅस्पियन कंपाऊंड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु कोणतेही घरगुती औषध किंवा खाण्यापिण्यात बदल तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करा. 

Web Title: Health Tips Runny nose allergy remedies : How to get rid of a runny nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.