Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्वयंपाक करताना ५ गोष्टी कटाक्षाने टाळा, स्वत:सह कुटूंबाच्याही जीवाला धोका- तब्येतीच्या तक्रारींचा त्रास

स्वयंपाक करताना ५ गोष्टी कटाक्षाने टाळा, स्वत:सह कुटूंबाच्याही जीवाला धोका- तब्येतीच्या तक्रारींचा त्रास

Health Tips: स्वयंपाक घरात काम करताना कोणत्या गोष्टी प्रत्येकीने अगदी आवर्जून लक्षात ठेवायलाच पाहिजेत याविषयीची ही खास माहिती...(avoid these 5 mistakes while cooking or working in kitchen)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 19:20 IST2025-02-13T09:19:07+5:302025-02-13T19:20:51+5:30

Health Tips: स्वयंपाक घरात काम करताना कोणत्या गोष्टी प्रत्येकीने अगदी आवर्जून लक्षात ठेवायलाच पाहिजेत याविषयीची ही खास माहिती...(avoid these 5 mistakes while cooking or working in kitchen)

Health Tips: avoid these 5 mistakes while cooking or working in kitchen | स्वयंपाक करताना ५ गोष्टी कटाक्षाने टाळा, स्वत:सह कुटूंबाच्याही जीवाला धोका- तब्येतीच्या तक्रारींचा त्रास

स्वयंपाक करताना ५ गोष्टी कटाक्षाने टाळा, स्वत:सह कुटूंबाच्याही जीवाला धोका- तब्येतीच्या तक्रारींचा त्रास

Highlightsस्वयंपाक करणाऱ्या किंवा स्वयंपाक घरात काम करणाऱ्या प्रत्येकाने या काही गोष्टी अगदी कटाक्षाने लक्षात ठेवायलाच पाहिजेत...

आपलं स्वयंपाक घर म्हणजे जणू आपलं आरोग्य जपणारं आपल्या घरातलं एक ठिकाण असतं. कारण स्वयंपाक घरात ज्या पद्धतीने जे काही पदार्थ तयार केले जातात तेच आपण बहुतांश वेळा खातो आणि त्यातूनच आपली तब्येत, आरोग्य सांभाळलं जातं. आता स्वयंपाक घरातच काही गोष्टींमध्ये चुका होत असतील तर त्याचा परिणाम थेट घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्यावर होणारच. म्हणूनच स्वयंपाक करणाऱ्या किंवा स्वयंपाक घरात काम करणाऱ्या प्रत्येकाने या काही गोष्टी अगदी कटाक्षाने लक्षात ठेवायलाच पाहिजेत असा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहूया..(avoid these 5 mistakes while cooking or working in kitchen)

 

स्वयंपाक घरात काम करताना ४ चुका टाळा

स्वयंपाक घरात काम करत असताना बहुतांश व्यक्तींकडून नकळत काही चुका होतात ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो, अशा चुका कोणत्या याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी dt.shwetashahpanchal या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

कोण म्हणतं अभिनेत्री खूप उशिरा आई होतात? बघा तिशीच्या आत आई झालेल्या बॉलीवूड सेलिब्रिटी...

१. यामध्ये त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात असणारं संगमरवरी खलबत्ता किंवा पोळपाट- लाटणं कधीही साबण लावून घासू नका. कारण साबणाच्या कणांची आणि त्याची रिॲक्शन होऊन त्यात काही सुक्ष्म पदार्थ तयार होतात. ते तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकतात.


 

२. दुसरी गोष्ट म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत घालून बाजारातून घरी आणलेल्या भाज्या, धान्यं किंवा इतर खाद्यपदार्थ तात्काळ पिशवीतून बाहेर काढा. दिवसेंदिवस या पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थ राहाणं अजिबात चांगलं नाही.

३. अनेक घरांमध्ये धान्य, साखर गूळ प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवलेले असतात. हे पदार्थ डब्यात भरून ठेवावे. 

महागडे हेअरऑईल वापरणं सोडा, फक्त ४ आवळे घेऊन तेल तयार करा- केस भराभर वाढून होतील दाट

४. पिठांच्या डब्यामध्ये प्लास्टिकचे चमचे टाकून ठेवलेले असतात. पीठ घेणं सोपं पडावं म्हणून ही सोय असते. पण असे महिनोंमहिने प्लास्टिकचे चमचे डब्यात टाकून ठेवणं आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे.

५. मायक्रोवेव्ह सेफ असं जरी प्लास्टिकच्या कंटेनरवर लिहिलेलं असलं तरी ते मायक्रोवेव्हमध्ये वापरू नये. त्याऐवजी नेहमी काचेच्या भांड्यांचाच वापर करावा. 

 

Web Title: Health Tips: avoid these 5 mistakes while cooking or working in kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.