Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातदुखी असो की पोटदुखी, लवंग फार कामाची! मात्र लवंग खाण्याची वेळ आणि पद्धतही महत्वाची..

दातदुखी असो की पोटदुखी, लवंग फार कामाची! मात्र लवंग खाण्याची वेळ आणि पद्धतही महत्वाची..

Health Tips: अनेक आजारांवर उपाय सोपे आणि घरगुती असतात, पण त्याची योग्य वेळ आणि योग्य प्रमाण माहीत नसेल तर उलट परिणामही होऊ शकतो. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:09 IST2025-06-24T12:03:05+5:302025-06-24T12:09:32+5:30

Health Tips: अनेक आजारांवर उपाय सोपे आणि घरगुती असतात, पण त्याची योग्य वेळ आणि योग्य प्रमाण माहीत नसेल तर उलट परिणामही होऊ शकतो. 

Health Tips: A clove will remove dental, oral, and stomach disorders; but know the 'exact' time! | दातदुखी असो की पोटदुखी, लवंग फार कामाची! मात्र लवंग खाण्याची वेळ आणि पद्धतही महत्वाची..

दातदुखी असो की पोटदुखी, लवंग फार कामाची! मात्र लवंग खाण्याची वेळ आणि पद्धतही महत्वाची..

आपल्या स्वयंपाक घरात वापरले जाणारे पदार्थ हे अर्ध्याहून अधिक आजारांवर गुणकारी ठरतील असे उपाय आहेत. पण ते कधी, किती प्रमाणात आणि किती काळ घ्यायचे हे माहीत नसेल तर त्याचा शरीरावर उलट परिणामदेखील होऊ शकतो.  उदा. लवंग

खडा मसाला किंवा गरम मसाला यात समाविष्ट होणारी लवंग अनेक प्रकारचे आजार दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.  दम, खोकला, आम्लपित्त,उलटी यांवर लवंगाचा उपयोग होतो. खोकला व सर्दी यांवर लवंगाचा काढा करून त्यात मध घालून दयावा. कप मोकळा होतो. लवंगापासून लवंगादी वटी , लवंगोदक, लवंगादी चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण ही औषधे बनवतात. जेवणात, मसाल्याच्या पदार्थात, साखर भात तयार करताना, विडा लावताना लवंग वापरली जाते.

लवंग कधी खावी?

अंगदुखी : जर तुम्हाला अंगदुखी होत असेल तर त्या कालावधीत रोज सकाळी ब्रश झाल्यावर अंशपोटी एक लवंग चघळा.  ज्याप्रमाणे औषधाची गोळी घेतल्यावर तिचा असर होतो, त्याप्रमाणे लवंगीचा रस पोटात गेल्याने एक दोन दिवसात अंगदुखीची तक्रार कमी कमी होत जाते. म्हणून लवंगीला नॅचरल पेनकिलर म्हणतात. 

सूज कमी होण्यास मदत : जर तुम्हाला अंगदुखीबरोबरच शरीराच्या विशिष्ट भागावर सूज येत असेल तर ती कमी होण्यासाठी लवंग मदत करते. मात्र त्यासाठीही रोज सकाळी एक लवंग चावून खावी. दिवसाला एक लवंग हे प्रमाण पुरेसे आहे. सूज उतरल्यावर हा उपाय थांबवावा. 

पचन शक्ती : ज्यांना वारंवार पोटाचे विकार होतात त्यांनी आपल्या आहारात किंवा रोज सकाळी अंशपोटी एक लवंग चावून खाण्याचा सराव ठेवावा. त्यामुळे पोटाशी निगडित समस्या दूर होतात आणि पचन क्रिया सुधारते. 

तोंडाचे विकार तसेच दुर्गंध : अनेक लोकांच्या तोंडाला ब्रश करूनही कायमस्वरूपी दुर्गांध येतो. अशा लोकांनी रोज एक लवंग चावून खावी. जेणेकरून तोंडाच्या समस्यां तर दूर होतीलच शिवाय दुर्गंध कायमचा दूर होईल. त्याबरोबरच सकाळी आणि रात्री ब्रश करण्याचा सराव ठेवा. काहीही खाल्ल्यावर खळखळून चूळ भरा. 

रोग प्रतिकारशक्ती वाढते : काही लोक किरकोळ कारणावरून आजारी पडतात. सर्दी, ताप, खोकला, थंडी असे कोणतेही कारण त्यांना पुरते. याचे कारण म्हणजे त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते. लवंगीत असणारे औषधी गुणधर्म शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. शरीर निरोगी ठेवतात. 

Web Title: Health Tips: A clove will remove dental, oral, and stomach disorders; but know the 'exact' time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.