भारतीय घरांमध्ये हळद मसाल्याच्या पदार्थांमध्ये असतेच. हळदीशिवाय भारतीय पदार्थ अपूर्ण आहेत. याव्यतिरिक्त हळदीला औषधी गुणधर्म असलेला पदार्थ म्हणून दर्जा प्राप्त आहे. हळदीत असे अनेक गुणधर्म असतात ज्याचा तुम्ही रोजच्या आहारात समावेश करू शकता. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार रोजच्या आहारात तुम्ही हळदीचा समावेश केला तर तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.
प्रसिद्ध योग गुरू हंसा योगेंद्र यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हंसाजी योगेद्र यांनी हळदीचे काही फायदे सांगितले आहेत. जर तुम्ही रोज हळदीचे सेवन केले तर शरीरात काय काय बदल होतात समजून घेऊ.
रोज हळद खाण्याचे फायदे
डॉक्टर हंसाजी सांगतात की हळद वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करते. यातील एंटी इंफ्लेमेटरी गुण सांध्यांच्या वेदना, ऑस्टिओआर्थरायटिसपासून आराम देतात. जखम झाल्यानंतर किंवा वेदना उद्भवल्यास गरम दूध दिले जाते. हळदी एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी सेप्टीक गुण असतात ज्यामुळे जखम लवकर भरण्यास मदत होते.
मेंदूसाठी फायदेशीर
स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी हळद फायदेशीर ठरते. हळदीतील करक्यूमीन मेंदू कमकुवत होऊ देत नाही. ज्यामुळे मेमरी लॉसचा धोका टळतो.
इम्युनिटी वाढण्यास मदत होते
हळदी इम्युनिटी वाढवण्यास करते. यातील एंटी व्हायरल गुण शरीराला संक्रमणाशी लढण्याची ताकद देतात. १ चमचा हळदीत, काळी मिरी, आलं मिसळल्यास इम्युनिटी वाढण्यास मदत होते.
त्वचेसाठी फायदेशीर
हळद त्वचेसाठी फायदेशीर ठरते. ज्यामुळे त्वचेला ग्लो येतो, पिंपल्स कमी होतात तसंच डाग हलके होतात. म्हणून रोज सकाळी कोमट पाण्यात १ चुटकी हळद घालून याचे सेवन करा,
या गोष्टींची काळजी घ्या.
हंसाजी सांगतात की हळदीचे बरेच फायदे असले तरी योग्य प्रमाणात हळदीचे सेवन करावे. गॅस, एसिडीटी किंवा पोटाशी संबंधित समस्या असल्यास आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. एका दिवसाला अर्धा किंवा एक चमचा हळदीचं सेवन करणं सुरक्षित ठरतं.
