Ghee before sleeping benefits : भारतीय घरांमध्ये तूप भरपूर खाल्लं जातं. वेगवेगळ्या पदार्थांवर टाकलं जातं किंवा तुपात अनेक गोष्टी तळल्याही जातात. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदातही नियमितपणे तूप खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुपामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटामिन ए, व्हिटामिन डी आणि व्हिटामिन के असतात. इतकंच नाही तर यात कॅल्शिअम आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात. याच कारणानं तूप एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. तुम्ही रात्री झोपण्याआधी एक चमचा तूप खाल्लं तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. अनेक रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे.
सकाळी पोट लगेच होईल साफ
सकाळी ज्या लोकांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांनी तर आवर्जून रात्री झोपण्याआधी तूप खाल्लं पाहिजे. कोमट पाण्यात तूप टाकून प्याल तर यानं पचन तंत्र चांगल्या पद्धतीनं काम करतं. यानं पचनक्रिया सुरळीत होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
ग्लोइंग स्किन
हेल्दी स्किन मिळवण्यासाठी तुम्ही नियमितपणे तूप खाऊ शकता. शरीर डिटॉक्स करण्यास आणि त्वचेला ओलावा देण्याचं काम तूप करतं. यासाठी रोज झोपण्याआधी एक चमचा तूप खावं.
ब्रेन पॉवर
रात्री झोपण्याआधी एक चमचा तूप खाल्ल्यानं मेंदूची पॉवर वाढते आणि सोबतच स्मरणशक्तीही मजबूत होते.
बॅड कोलेस्टेरॉल कमी होईल
शरीरात वाढलेलं हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी देखील तूप फायदेशीर ठरतं. अशात रात्री झोपण्याआधी एक चमचा तूप खाऊ शकता.
झोपण्याआधी तूप कसं खाल?
रात्री झोपण्याच्या काही वेळ आधी एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात चमचाभर तूप टाकून प्या. जर तुम्हाला पाण्यातून प्यायचं नसेल तर थेट एक चमचा तूपही खाऊ शकता. तूप खाल्ल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावं.