Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ताप, सर्दीला हलक्यात घेऊ नका, H3N2 चा वेगाने प्रसार; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका

ताप, सर्दीला हलक्यात घेऊ नका, H3N2 चा वेगाने प्रसार; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका

H3N2 Virus : H3N2 व्हायरस विळखा घालत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 16:48 IST2025-09-15T16:47:22+5:302025-09-15T16:48:20+5:30

H3N2 Virus : H3N2 व्हायरस विळखा घालत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

H3N2 Virus spreading rapidly in delhi do not consider h3n2 as normal flu here are symptoms causes prevention | ताप, सर्दीला हलक्यात घेऊ नका, H3N2 चा वेगाने प्रसार; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका

ताप, सर्दीला हलक्यात घेऊ नका, H3N2 चा वेगाने प्रसार; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका

कोरोना व्हायरसची भीती लोकांच्या मनातून पूर्णपणे निघून गेलेली नसताना आणखी एका व्हायरसचा वेगाने प्रसार होत आहे. H3N2 व्हायरस विळखा घालत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चिंताजनक बाब म्हणजे या व्हायरसची लक्षणं सामान्य फ्लूसारखीच दिसतात, परंतु ती सामान्य फ्लूपेक्षा वेगळी आहेत कारण नॉर्मल औषधानेही बरी होत नाही. हा व्हायरस अनेकदा लहान मुलं, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना बळी बनवत आहे. 

H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस हा फ्लू निर्माण करणारा इन्फ्लूएंझा ए व्हायरसचा एक प्रकार आहे, जो मानवांना आणि प्राण्यांनाही प्रभावित करू शकतो. H3N2 फ्लूला सामान्य भाषेत सीझनल फ्लूचा एक गंभीर प्रकार म्हणता येईल. या व्हायरसचा 'H' म्हणजे Hemagglutinin  आणि 'N' म्हणजे Neuraminidase. हे दोन्ही व्हायरसच्या पृष्ठभागावर असलेले प्रोटीन आहेत. या प्रोटीनच्या आधारे H3N2 ओळखला जातो. जागतिक आरोग्य संघटना आणि ICMR च्या अहवालानुसार, H3N2 फ्लू सामान्य फ्लूपेक्षा वेगाने पसरू शकतो आणि गंभीर लक्षणं निर्माण करू शकतो.

H3N2 व्हायरसची लक्षणं

- सतत खूप ताप

- सतत कोरडा खोकला

- घसा खवखवणे

-फुफ्फुसांचा संसर्ग किंवा न्यूमोनिया  

- डोकेदुखी आणि शरीरदुखी

- श्वास घेण्यास त्रास

- नाक वाहणं किंवा बंद होणं

- खूप थकवा आणि अशक्तपणा

- भूक न लागणं

- छातीत दुखणं किंवा जडपणा

-उलट्या

-पोट खराब होणं

- निद्रानाश

- अस्वस्थ वाटणं

H3N2 व्हायरसपासून असा करा बचाव

- मास्कचा नियमित वापर

 -गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा

- वारंवार हात धुवा

- संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या

- पुरेशी झोप घ्या

- भरपूर पाणी प्या

-जर ताप २ दिवसांपेक्षा जास्त काळ राहिला, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छातीत दुखत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करा आणि वेळेवर टेस्ट करा.
 

Web Title: H3N2 Virus spreading rapidly in delhi do not consider h3n2 as normal flu here are symptoms causes prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.