Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कंबर दुखते-उन्हामुळे थकल्यासारखं वाटतं? फक्त १ लाडू रोज खा, हाडं बळकट-थकवा येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 17:25 IST

Green Moong Laddu Recipe : खूप घाम येणं, दुर्गंध आणि खाण्यापिण्यातील बदल शरीराची उर्जा कमी करतात.

हिरव्या मुगापासून तयार केलेल लाडू ताकद आणि एनर्जीचा उत्तम स्त्रोत आहेत. हे लाडू फक्त चवीला उत्तम नसतात तर पौष्टीकही असतात. पारंपारीक पद्धतीनं केले जाणारे हे लाडू दिवसभर एनर्जी देणारे एक हेल्दी स्नॅक्स मानले जाते. मुगाच्या लाडूंची सोपी, पारंपारीक रेसिपी समजून घेऊ. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर लवकर थकतं आणि थकवा, कमकुवतपणा, गॅसेसची समस्या अशा समस्या उद्भवतात. (Green  Moong Laddu Good For Health And Back Pain Relief)

खूप घाम येणं, दुर्गंध आणि खाण्यापिण्यातील बदल शरीराची उर्जा कमी करतात. अशा स्थितीत आहारात काही हेल्दी पदार्थांचा समावेश करायला हवा. जे पदार्थ पोषणानं परिपूर्ण असतात. हिरव्या मुगाचे लाडू हा एक हेल्दी पर्याय आहे. हे लाडू फक्त चवीला उत्तम नसतात तर एनर्जी देण्यातही मदत करतात. ज्यामुळे रोजचा थकवा कमी होण्यास मदत होते.

हे लाडू का खावेत? (Health Benefits Of Green Moong Laddu)

 हे लाडू  पारंपारीक पद्धतीनं बनवले जातात. यात तूप, गूळ, खडीसाखर आणि सुका मेवा घातला जातो. हे लाडू फक्त चवीला चांगले नसतात तर पोषक स्नॅक्सच्या स्वरूपात खाल्ले जातात. हिरवी मुगाची डाळ भाजून आणि वाटून  केले जाणारे हे लाडू दीर्घकाळ टिकून राहतात यामुळे अनेक घरांमध्ये बनवले जातात.

हिरवे मुगाचे लाडू अनेक घरांमध्ये पारंपारीक पद्धतीनं बनवले जातात. जेव्हा  शरीराला हलकी एनर्जी हवी असते तेव्हा स्नॅक्सच्या स्वरूपात हे लाडू खायला हवेत. या पद्धतीनं लाडू खाल्ल्यानं थकवा दूर होतो तसंच शरीर ताजंतवानं वाटतं. बराचवेळ भूक लागत नाही आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण हे लाडू खाऊ शकते.

हिरवी मुगाची डाळ तब्येतीसाठी उत्तम मानली जाते. यात प्रोटीन्स, फायबर्स आणि इतर पोषक तत्व असतात ज्यामुळे शरीर मजबूत होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांत पोटासाठी उत्तम मानले जाते. यात बदाम, काजू,खरबूजाच्या बिया यातील पोषण गुण असतात. यातील सर्व ड्राय फ्रुट्स शरीराला ताकद देतात आणि कमजोरी दूर होण्यासही मदत करतात.

हिरव्या मुगाचे लाडू कसे करतात? (Green Moong Laddu Recipe)

सगळ्यात आधी हिरवे मूग व्यवस्थित साफ करून मंद आचेवर भाजून घ्या. यातून सुगंध येईपर्यंत भाजून घ्या. नंतर थंड झाल्यानंतर यात बदाम, काजू आणि खरबूजाच्या बिया घालून छोटे तुकडे करा. कढईत साजूक तूप गरम करून त्यात वाटलेले मूग  घालून  4 ते 5 मिनिट भाजून घ्या. मिश्रण सोनेरी झाल्यांनतर त्यात सुकामेवा, खडीसाखर वाटून घाला. यात फ्रेश क्रिम आणि वेलची पावडर घाला. जेव्हा हे मिश्रण हलकंस कोमट होईल तेव्हा छोटे छोटे लाडू वळून घ्या. गरजेनुसार थोडं तूप मिसळू शकता.

हे लाडू कधी खावेत? (When To Eat Green Moong Laddu)

हिरव्या मुगाचे लाडू तुम्ही स्नॅक्सच्या स्वरूपात खाऊ शकता. अनेकदा लोक सकाळी नाश्त्यानंतर  किंवा संध्याकाळच्या भूकेसाठी हे लाडू खाणं पसंत करतात. एकावेळी १ लाडू खाणं पुरेसं ठरतं. जेव्हा तुम्हाला स्नॅक्स खायची इच्छा होत असेल तेव्हा मधल्यावेळात हे लाडू खाऊ शकता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Green Moong Laddu: Energy boost, relieves back pain and fatigue.

Web Summary : Green moong laddus are a traditional, healthy snack, rich in protein and fiber. They provide energy, reduce fatigue, and are beneficial in summer. Made with ghee, jaggery, and dry fruits, these laddus offer sustained energy and are good for all ages.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्नफिटनेस टिप्सस्त्रियांचे आरोग्य