Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोट-मांड्या कमीच होत नाही? 'या' डाळीचं पाणी प्या; भरभर घटेल चरबी-गॅसचा त्रासही कमी होईल

पोट-मांड्या कमीच होत नाही? 'या' डाळीचं पाणी प्या; भरभर घटेल चरबी-गॅसचा त्रासही कमी होईल

Green Moong Dal Water Control Obesity (Vajan kami karayche upay) which dal is good for weight loss : सालीसकट असलेल्या या मुगाच्या डाळीच्या सेवनानं वजन वेगानं कमी होण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:09 IST2025-09-02T13:38:23+5:302025-09-02T15:09:12+5:30

Green Moong Dal Water Control Obesity (Vajan kami karayche upay) which dal is good for weight loss : सालीसकट असलेल्या या मुगाच्या डाळीच्या सेवनानं वजन वेगानं कमी होण्यास मदत होते.

Green Moong Dal Water Control Obesity and Gastric Problems Weight Loss Dal | पोट-मांड्या कमीच होत नाही? 'या' डाळीचं पाणी प्या; भरभर घटेल चरबी-गॅसचा त्रासही कमी होईल

पोट-मांड्या कमीच होत नाही? 'या' डाळीचं पाणी प्या; भरभर घटेल चरबी-गॅसचा त्रासही कमी होईल

भारतीय आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश केला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का वजन कमी करण्यासाठीसुद्धा डाळी उपयुक्त ठरू शकतात. डाळी डिटॉक्सिफाईंड एजंटप्रमाणे काम करतात. शरीरात जमा झालेली घाण डिटॉक्स होते. (Which dal is good for weight loss) याव्यतिरिक्त यातील फायबर्ससुद्धा शरीराला बरेच फायदे देतात आणि फॅट पचवण्याची गती वेगानं होते. ज्यामुळे व्यवस्थित वजन कमी होतं आणि आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते. याव्यतिरिक्त डाळीचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. (Green Moong Dal Water Control Obesity and Gastric Problems)

वजन कमी करण्यासाठी हिरवी मुगाची डाळ उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी तुम्ही हिरव्या मुगाच्या डाळीचं पाणी पिऊ शकता. सालीसकट असलेल्या या मुगाच्या डाळीच्या सेवनानं वजन वेगानं कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त डाळीचं पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म वेगानं होतो. आपले आतडे फॅटस वेगानं पचवतात. ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते. मूग डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणजे  साखरेची पातळी वेगानं वाढत नाही किंवा अचानक कमीही होत नाही आणि भूक नियंत्रणात राहते.

ओबेसिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार डाळी खाल्ल्यानं पोट भरल्यासारखं वाटतं ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते (Ref). डाळींचा आहारात समावेश करणे हा खूपच सोपा उपाय आहे. या अभ्यासानुसार उच्च प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास भूक कमी  होण्यास मदत होते आणि शरीरातील उष्णता वाढते ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. मूग डाळ  हा उच्च प्रथिनेयुक्त आहाराचा एक चांगला भाग आहे.

हिरवी मूगाची डाळ खाण्याचे इतर फायदे

हिरव्या डाळीचे पाणी प्यायल्यानं गॅसेसचा त्रास कमी होतो. आतड्यांमधील पाणी मेंटेन राहते आणि ही क्रिया वेगानं होते. ज्यामुळे मल मुलायम होतो आणि सहज शरीराच्या बाहेर पडतो. याव्यतिरिक्त गॅसेसपासून सुटका मिळवण्यासही मदत होते.आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. पोट साफ राहिल्यानं वजन कमी करण्यासही मदत होते.ओव्हरइटींग टाळण्यासाठी तुम्ही या डाळीचं पाणी पिऊ शकता.

यात फायबर्स असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. शरीराचा ओव्हरइटींगपासून बचाव होतो आणि पचनक्रियासुद्धा चांगली राहते. मूग डाळीचे पाणी शरीरातील फॅट्स मेटाबॉलिझ्म वाढवते. ही डाळ खाल्ल्यानं शरीरातील फॅट मेटाबॉलिझ्म वाढते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासही मदत होते. या डाळीचं सूप करून पिऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता.

Web Title: Green Moong Dal Water Control Obesity and Gastric Problems Weight Loss Dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.