असे अनेक पदार्थ आहेत जे आपण फक्त चवीसाठी स्वयंपाक करताना वापरतो. मात्र ते पदार्थ मुळात फारच पौष्टिक असतात, त्यांचा वापर आहारात करणे फार फायद्याचे ठरते. जसे की कोथिंबीर. (Green coriander juice is cooling for the stomach - Drinking coriander juice will give you many benefits, health tips )एखादा पदार्थ छान दिसावा म्हणून वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली जाते. मात्र ही कोथिंबीर मुळात फारच आरोग्यदायी आहे. दैनंदिन आहारात कोथिंबीर वापरणे अतिशय सोपे आणि परिणामकारक आहे. भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी किंवा पराठ्यामध्ये कोथिंबीर घातल्यास चव तर छान लागतेच शिवाय पदार्थ पौष्टिकही होतो.
पचनसंस्थेसाठी ही कोथिंबीर फार फायद्याची ठरते. कोथिंबीर खाल्याने छातीत होणारी जळजळही कमी होते. पोटातील काही विकार बरे होतात. गॅसेसची समस्या दूर होते. बधकोष्टता तसेच अपचन असे काही त्रास होत असतील तर मग ते त्रास कमी होण्यासाठी कोथिंबीरीचा रस फायद्याचा ठरतो.
कोथिंबीरीत अँण्टी ऑक्सिडंट्स, जीवनसत्वे असतात. जीवनसत्त्वांमध्ये 'ए', 'सी', 'के' असतात. खनिजद्रव्ये जसे की कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. यातील नैसर्गिक संयुगे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी कोथिंबीरीचा उपयोग अनेक प्रकारांनी होतो. कोथिंबीरीत नैसर्गिक अँण्टी बॅक्टेरियल आणि अँण्टी फंगल गुणधर्म असतात. जे आतड्यांतील हानिकारक जंतूंचा नाश करून चांगल्या जिवाणूंचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात.
आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कोथिंबीर ही पित्त कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. काहींना पित्ताचा फारच त्रास असतो. सतत पित्त होते. त्यामुळे उलट्या आणि पोटाचे विकारही होतात. त्यामुळे पित्त होऊ नये यासाठी हा कोशिंबीरीचा ज्यूस प्यावा आरोग्यासाठी फार फायद्याचा असतो. या पुढे कोथिंबीर घाताना तिच्या आरोग्यदायी फायद्यांचाही विचार करा.
नियमित आहारात कोथिंबीरीचा समावेश केल्यास पचनक्रिया सुदृढ राहते. पोटाचे विकार दूर होतात आणि संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे कोथिंबीरीचा उपयोग हा केवळ सवयीचा भाग म्हणून न करता, तो आरोग्याच्यादृष्टीने करणे अधिक लाभदायक ठरते.