बेदाणे आणि मनुका हे दोन्ही एकसारखेच असावेत, असा काय त्यांच्यामध्ये फरक असणार आहे, असं बहुतांश लोकांना वाटतं. पण ते तयार करण्याची प्रक्रिया आणि ते खाऊन मिळणारे शारिरीक फायदे या दोघांमध्ये खूप जास्त फरक आहे. आपल्या तब्येतीनुसार जर त्यांच्यापैकी योग्य पदार्थ खाल्ला गेला तरच ते तब्येतीसाठी फायदेशीर ठरू शकतं. म्हणूनच त्या दोघांमध्ये नेमका काय फरक, दोघांपैकी जास्त फायदेशीर काय आणि आपल्या तब्येतीनुसार आपण मनुका खायला हव्या की बेदाणे खायला हवे, हे कसं ओळखायचं ते पाहा..(golden raisins or black raisins which one is more healthy?)
बेदाणे आणि मनुका यांच्यापैकी जास्त फायदेशीर काय?
बेदाणे आणि मनुका यांच्यामध्ये कोणते प्रमुख फरक आहेत, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ dt.shwetashahpanchal या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आहारतज्ज्ञ सांगतात की बेदाणे जे असतात त्यांचा रंग आणि त्यांची शेल्फ लाईफ वाढविण्यासाठी त्यांच्यावर बरेच केमिकल्स फवारले जातात. त्याउलट बेदाण्यांच्या तुलनेत काळ्या मनुका बऱ्याच प्रमाणात त्यांच्या नैसर्गिक रुपात असतात. त्या उन्हामध्ये वाळवल्या जातात आणि त्यांच्यावर केमिकल्सचा मारा झालेला नसतो.
बाजरीच्या खमंग भाताची रेसिपी! हिवाळ्यातला पारंपरिक मेन्यू- पचायला सोपा, चविष्ट आणि पौष्टिक..
बेदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं. त्यामुळे ते निश्चितच आरोग्यदायी आहेत. बेदाणे खाल्ल्याने एनर्जी नक्की मिळते. पण जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील किंवा अस्थमासारखे आजार असतील तर त्यांच्यावर फवारलेलं केमिकल तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं.
जर तुम्हाला मासिक पाळीत पोटदुखीचा खूप त्रास होत असेल किंवा पीसीओडी, पीसीओएस यांच्यासारखे त्रास असतील तर हे त्रास कमी करण्यासाठी काळ्या मनुका खाणे खूप उपयुक्त ठरतात. याशिवाय पचनाशी संबंधित आजार कमी करण्यासाठी किंवा अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठीही काळ्या मनुका खाव्या.
अंगात खूपच हुडहुडी भरली, थंडी सहनच होईना? 'ही' योगमुद्रा करा, काही मिनिटांतच उबदार वाटेल...
ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो, त्यांच्यासाठीही काळ्या मनुका खाणे फायदेशीर ठरते. याशिवाय ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं, त्यांनीही काळ्या मनुका नियमितपणे खायला हव्या. मनुका असो किंवा बेदाणे असो ते स्वच्छ धुवूनच खायला हवे. रात्री झोपण्यापुर्वी ते पाण्याने धुवून घ्या आणि नंतर पाण्यामध्ये भिजत घाला. दुसऱ्यादिवशी उपाशीपोटी खा. यामुळे त्यांची पौष्टिकता तर वाढतेच पण ते स्वच्छही होतात.
