Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हातपाय थरथरतात ?काम करताना दम लागतो? शरीराला पोटॅशियमची गरज आहे , आहारात करा बदल कारण ......

हातपाय थरथरतात ?काम करताना दम लागतो? शरीराला पोटॅशियमची गरज आहे , आहारात करा बदल कारण ......

Getting tired fast while working ? The body needs potassium, change your diet because.... : शरीराने दिलेले हे संकेत वेळीच ओळखा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2026 15:09 IST2026-03-29T15:08:38+5:302026-03-29T15:09:50+5:30

Getting tired fast while working ? The body needs potassium, change your diet because.... : शरीराने दिलेले हे संकेत वेळीच ओळखा.

Getting tired fast while working ? The body needs potassium, change your diet because...... | हातपाय थरथरतात ?काम करताना दम लागतो? शरीराला पोटॅशियमची गरज आहे , आहारात करा बदल कारण ......

हातपाय थरथरतात ?काम करताना दम लागतो? शरीराला पोटॅशियमची गरज आहे , आहारात करा बदल कारण ......

शरीरातील पोटॅशियम हे अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. ते शरीरातील पेशींचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी, स्नायू आणि मज्जासंस्थेचे योग्य कार्य होण्यासाठी तसेच हृदयाच्या ठोक्यांचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे शरीरात पोटॅशियमची पातळी कमी झाली तर त्याचा थेट परिणाम आरोग्यावर दिसू लागतो. पोटॅशियम कमी झाल्याची लक्षणे सुरुवातीला हलकी वाटू शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास ती गंभीर होऊ शकतात. वारंवार थकवा जाणवणे, अशक्तपणा येणे आणि अगदी हलकं काम केलं तरी दम लागणे ही याची सुरुवातीची चिन्हे असतात. (Getting tired fast while working ? The body needs potassium, change your diet because......)अनेकांना आकडी येणे, पायात गोळे येणे किंवा हातपाय थरथरणे असा त्रास होऊ लागतो. काही वेळा हृदयाचे ठोके अनियमित होणे, छातीत धडधड वाढणे किंवा चक्कर येणे ही लक्षणेही दिसतात. पोटॅशियमची कमतरता वाढली तर बद्धकोष्ठता, मळमळ, उलटी किंवा भूक न लागणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. काही लोकांमध्ये मानसिक अस्वस्थता, चिडचिड किंवा एकाग्रतेचा अभावही जाणवतो.

पोटॅशियम कमी झाल्यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे हृदयावर येणारा ताण. हृदयाचे ठोके अनियमित झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. स्नायू कमकुवत झाल्यामुळे चालणे, उभे राहणे किंवा दैनंदिन कामे करणे कठीण होऊ शकते. तसेच पचनसंस्थेवरही परिणाम होऊन अन्न पचण्यास त्रास होतो. दीर्घकाळ पोटॅशियम कमी राहिल्यास किडनीच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही समस्या लहान समजून दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

पोटॅशियमची पातळी वाढवण्यासाठी आहारात काही सोपे बदल केल्यास मोठा फायदा होतो. केळी हे पोटॅशियमचे उत्तम स्रोत मानले जाते, त्यामुळे रोज एक केळे खाण्याची सवय ठेवावी. त्याचप्रमाणे नारळपाणी, दही, दूध, डाळी, पालक, बीट, बटाटा, रताळं यांसारखे पदार्थ आहारात समाविष्ट करावेत. फळांमध्ये संत्री, मोसंबी, डाळिंब आणि आंबा यामध्येही पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणेही तितकेच आवश्यक आहे, कारण डिहायड्रेशनमुळेही पोटॅशियम कमी होऊ शकते. याशिवाय, अतिसेवन टाळणेही महत्त्वाचे आहे. काही वेळा औषधांच्या वापरामुळे किंवा अतिसार, उलट्या यामुळे पोटॅशियम झपाट्याने कमी होऊ शकते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. स्वतःहून सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा योग्य तपासणी करूनच उपचार करणे अधिक सुरक्षित असते.
 

Web Title : पोटेशियम की कमी: लक्षण, जोखिम और बेहतर स्वास्थ्य के लिए आहार परिवर्तन

Web Summary : पोटेशियम स्वास्थ्य के लिए महत्वपूर्ण है। कमी से थकान, मांसपेशियों में कमजोरी और हृदय संबंधी समस्याएं होती हैं। केले, नारियल पानी, डेयरी, पालक और शकरकंद के माध्यम से सेवन बढ़ाएं। जटिलताओं से बचने और उचित उपचार सुनिश्चित करने के लिए हाइड्रेटेड रहें और सप्लीमेंट्स लेने से पहले डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Potassium Deficiency: Symptoms, Risks, and Dietary Changes for Better Health

Web Summary : Potassium is crucial for health. Deficiency causes fatigue, muscle weakness, and heart issues. Increase intake through bananas, coconut water, dairy, spinach, and sweet potatoes. Stay hydrated and consult a doctor before taking supplements to avoid complications and ensure proper treatment.