आपल्या घरात असलेलं आलं म्हणजे केवळ स्वयंपाकातील एक साधा पदार्थ नाही, तर एक नैसर्गिक औषध आहे. आलं रोजच्या आहाराचा भाग आहे. आमटी, भाजी, इतरही साऱ्या पदार्थांत आल्याचा वापर केला जातो. त्यामुळे पदार्थाला एक वेगळी चव येते. (gasses and indigestion? This is a simple solution: eat a piece of ginger with salt.)तसेच चहाप्रेमींसाठी आलं अगदी आवडता पदार्थ आहे. आल्याचा चहा पिणे मानसिक आरोग्यासाठी नक्कीच चांगले ठरते. झोप उडवून कामाला जोर मिळतो. त्यामुळे आल्याला खास महत्व आहेच. मात्र हे आलं आरोग्यासाठीही फार चांगले असते.
आलं हे मुळात चवीला तिखट असते, तसेच शरीरासाठी उष्ण असते. त्यामुळे हिवाळ्यात आणि थंडीत आल्याचा वापर केला जातो. त्यामुळे शरीराला उब मिळते. आलं पचनाला चालना देणारं असतं. जेवणाआधी थोडं आलं आणि चिमूटभर मीठ घेतल्यास तोंडात लाळ स्रवते आणि पोटात रस निर्माण होऊन भूक लागते. त्यामुळे अन्न पचायला मदत होते. ज्यांना अन्न खाल्ल्यानंतर पोट फुगणे, ढेकर येणे किंवा अपचनाचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हा उपाय विशेष उपयुक्त आहे.
मीठ हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवतं आणि लघवीद्वारे होणारी मिठाची कमतरता भरुन काढते. जेव्हा ते आल्यासोबत घेतलं जातं, तेव्हा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. आल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, तर मिठात असलेले खनिज घटक शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवतात. त्यामुळे हे दोन्ही मिळून शरीराला उष्णता, ताकद आणि ताजेपणा देतात.
थंड हवामानात आल्याचा तुकडा मिठासह खाल्ल्यास सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते. आलं घशातील जंतूंवर प्रभावीपणे काम करतं आणि घसा खवखवणे कमी करते. सकाळी किंवा दुपारच्या जेवणापूर्वी एक छोटा आल्याचा तुकडा मिठात बुडवून खाल्ल्यास पचनसंस्था सक्रिय होते आणि जेवण नीट पचतं. अर्थात रोज असे खाणे गरजेचे नाही. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करावे. आल्याचं हे साधं मिश्रण भूक वाढवतं, पचन सुधारतं, शरीराला उब देतं आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते.
Web Summary : Ginger with salt aids digestion, relieves bloating, and boosts immunity. This simple remedy warms the body, stimulates appetite, and improves overall gut health, especially after festive indulgence. Consuming weekly is sufficient.
Web Summary : अदरक और नमक पाचन में मदद करता है, पेट फूलना कम करता है और प्रतिरक्षा को बढ़ाता है। यह सरल उपाय शरीर को गर्म करता है, भूख बढ़ाता है, और समग्र आंत स्वास्थ्य में सुधार करता है, खासकर त्योहारों के बाद। साप्ताहिक सेवन पर्याप्त है।