Join us

आपली मुलं हुशार व्हावी असं वाटतं, ‘हे’ पदार्थ आहारात हवेच! मुलांच्या वाढीसाठीचं टॉनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:59 IST

Foods That Can Increase Your Child Memory : एक्सपर्ट्सच्यामते मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी अक्रोडचे सेवन करायला हवे.

तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे राहावं तर लहानपणापासूनच  त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. (Parenting Tips) मुलांच्या मानसिक आरोग्याच्या विकासासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा, ज्यामुळे त्यांचे ब्रेन फंक्शन चांगले काम करेल. न्युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रियांका सहरावत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहेत. (Foods That Can Increase Your Child Memory)

एक्सपर्ट्सच्यामते मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी अक्रोडचे सेवन करायला हवे. यात ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. एंटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे मेंदूचे फ्रि रॅडिकल्सपासून होणारे नुकसान वाचवता येते. मेंदूचे कार्य सुरळीत करण्यासाठी प्रेरणा मिळते.

 

एक्सपर्ट्स सांगतात की मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांना बेरीज खायला द्यायला हव्यात, यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि फ्लेवोनोइड्सचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे  स्मरणशक्ती चांगली राहते. ब्लड सर्क्युलेशनही चांगले राहते. यामुळे वय वाढीची प्रक्रिया संथ होते आणि ब्रेन फंक्शनमध्ये सुधारणा होते. 

थकवा येतो- व्हिटामीन B-12 कमी झालं? जेवणात या डाळीचं वरण खा, भराभर वाढेल व्हिटामीन B-12

याव्यतिरिक्त मेंदूच्या विकासासाठी आहारच नाही तर शारीरिक गतिविधीसुद्धा सुरू ठेवायला  हव्यात. तुम्ही जितके फिजिकली एक्टिव्ह राहाल तेव्हढाच मेंदूला चांगला ऑक्सिजन मिळेल. रक्त प्रवाह व्यवस्थित राहील आणि मेंदू चांगल्या पद्धतीनं काम करेल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यपालकत्व