lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Foods for constipation : कधी गॅस तर कधी पोट साफ व्हायला त्रास जाणवतो? चांगल्या पचनासाठी रोज खा 'हे' 6 पदार्थ

Foods for constipation : कधी गॅस तर कधी पोट साफ व्हायला त्रास जाणवतो? चांगल्या पचनासाठी रोज खा 'हे' 6 पदार्थ

Foods for constipation : जेव्हा बद्धकोष्ठता असते तेव्हा वारंवार मल बाहेर पडण्यास त्रास होतो. खरं तर ही स्थिती खूप वेदनादायक आहे. अशा स्थितीत, पचनक्रिया चांगली राहण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 03:43 PM2022-01-09T15:43:34+5:302022-01-09T16:18:17+5:30

Foods for constipation : जेव्हा बद्धकोष्ठता असते तेव्हा वारंवार मल बाहेर पडण्यास त्रास होतो. खरं तर ही स्थिती खूप वेदनादायक आहे. अशा स्थितीत, पचनक्रिया चांगली राहण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.

Foods for constipation : 7 foods that can help you poop and relieve constipation | Foods for constipation : कधी गॅस तर कधी पोट साफ व्हायला त्रास जाणवतो? चांगल्या पचनासाठी रोज खा 'हे' 6 पदार्थ

Foods for constipation : कधी गॅस तर कधी पोट साफ व्हायला त्रास जाणवतो? चांगल्या पचनासाठी रोज खा 'हे' 6 पदार्थ

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे लोक अनेकदा बाहेरचे अन्न खातात आणि त्यांना सतत काहीतरी चटपटीत खावेसे वाटते. विशेषत: जे लोक आठवड्यातून 4-5 दिवस बाहेरचे अन्हेल्दी, तेलकट आणि मसालेदार अन्न खातात. त्यांना शारीरिक समस्या सुरू होतात आणि या समस्या बद्धकोष्ठतेपासून सुरू होतात. तसे, कोणत्याही व्यक्तीला बद्धकोष्ठता असणे सामान्य आहे. आपली बिघडलेली जीवनशैली याला पूर्णपणे जबाबदार आहे. (Remedies for constipation) त्यामुळे पोट फुगणे आणि गॅस्ट्रिकचा त्रास होतो.

जेव्हा बद्धकोष्ठता असते तेव्हा वारंवार मल बाहेर पडण्यास त्रास होतो. खरं तर ही स्थिती खूप वेदनादायक आहे. अशा स्थितीत, पचनक्रिया चांगली राहण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य आहार घेऊन तुम्ही या स्थितीचा सामना करू शकता. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा जाणून घेऊया.

ब्रोकोली, कडधान्य

पचनाचे त्रास कमी करण्यासाठी  हिरव्या भाज्या हा सर्वोत्तम मार्ग आहे. पालक, स्प्राउट्स आणि ब्रोकोली यांसारख्या हिरव्या भाज्या केवळ पोषक तत्वांनीच समृद्ध नसतात, तर त्या त्यांच्यातील फायबर्ससाठी देखील ओळखल्या जातात. हे तुमच्या पोटासाठी खूप चांगले आहेत, ज्यामुळे आतड्याची हालचाल होत नाही. भाज्यांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला बद्धकोष्ठतेपासून लवकर आराम मिळतो.

2017 च्या अभ्यासानुसार, निरोगी लोक 4 आठवडे दररोज 20 ग्रॅम कच्ची ब्रोकोली किंवा 20 ग्रॅम स्प्राउट्स खातात. संशोधकांना असे आढळून आले की ज्यांनी ब्रोकोली खाल्ली त्यांच्यामध्ये बद्धकोष्ठतेची लक्षणे कमी होती आणि आतड्याची हालचाल जलद दिसून आली.

आळशीच्या बिया

फायबर-समृद्ध अन्नपदार्थ असण्याव्यतिरिक्त, फ्लेक्ससीड्स तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. फ्लेक्ससीड्समुळे मल पास करणे सोपे होते. आळशीच्या बीयांच्या सेवनानं  मलाशय स्वच्छ करणे सोपे होते. त्याच्या सेवनाने खूप चांगले परिणाम मिळू शकतात. पण आळशीच्या बीया एकावेळी जास्त प्रमाणात खाऊ नये.

प्रोबायोटिक्स

प्रोबायोटिक्स हे जिवंत जीवाणू आहेत जे नैसर्गिकरित्या दही, कोम्बुचा, किमची आणि टेम्पेह सारख्या पदार्थांमध्ये आढळतात. हे पोटाचे कार्य सुधारून पचन सुधारते. अभ्यासात असे आढळून आले आहे की प्रोबायोटिक्स आतड्याचे मायक्रोबायोम वाढवतात, जे रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास, कोणतीही जळजळ कमी करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.

डाळी

 मसूर, चणे आणि मटारमध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करते. दररोज 100 ग्रॅम कडधान्ये, डाळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

फळं

किवी, संत्रा,  सफरचंद ही फळे पचनासाठी खूप चांगली मानली जातात. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या कोणालाही या फळांचे सेवन केल्याने आराम मिळतो. वास्तविक या सर्व फळांमध्ये फायबरचे प्रमाण खूप चांगले असते. याशिवाय त्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी, सॉर्बिटॉल आणि फ्रुक्टोज देखील असतात, जे बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

जास्तीत जास्त पाणी प्या

तुमच्या आतड्याची हालचाल सुधारण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे पाणी. निरोगी पचनसंस्थेसाठी हायड्रेटेड राहणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्हाला दिवसभर भरपूर पाणी प्यावे लागेल. शरीरातील द्रवपदार्थाचा अभाव हे बहुतेकदा बद्धकोष्ठतेचे पहिले कारण असते. त्यामुळे दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे तुमचा उत्साह तर राहतोच शिवाय आतड्याची हालचालही चांगली राहते.

Web Title: Foods for constipation : 7 foods that can help you poop and relieve constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.