Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री भरपूर झोप घेतल्यावरही सकाळी चेहरा सुजलेला दिसतो? कारणं वाचा, काळजी घ्या...

रात्री भरपूर झोप घेतल्यावरही सकाळी चेहरा सुजलेला दिसतो? कारणं वाचा, काळजी घ्या...

Puffy Face Causes: एखाद्या वेळेस असं होणं ठीक आहे. पण जर असं नेहमीच होत असेल तर हा काही गंभीर समस्यांचा संकेत असू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 10:31 IST2025-06-23T10:30:55+5:302025-06-23T10:31:58+5:30

Puffy Face Causes: एखाद्या वेळेस असं होणं ठीक आहे. पण जर असं नेहमीच होत असेल तर हा काही गंभीर समस्यांचा संकेत असू शकतो.

Expert tells the reasons you might be see a puffy face in the morning | रात्री भरपूर झोप घेतल्यावरही सकाळी चेहरा सुजलेला दिसतो? कारणं वाचा, काळजी घ्या...

रात्री भरपूर झोप घेतल्यावरही सकाळी चेहरा सुजलेला दिसतो? कारणं वाचा, काळजी घ्या...

Face Swelling Causes: बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की, झोपेतून उठल्यावर जेव्हा तुम्ही चेहरा बघता तेव्हा सुजलेला दिसते, डोळ्यांखाली देखील सूज असते आणि चेहरा थकलेला दिसतो. बऱ्याचदा सामान्य बाब म्हणून जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात. एखाद्या वेळेस असं होणं ठीक आहे. पण जर असं नेहमीच होत असेल तर हा काही गंभीर समस्यांचा संकेत असू शकतो.

झोपेतून उठल्यावर चेहऱ्यावर सूज दिसण्याच्या कारणांबाबत NBT ला डॉ. पीयूष मिश्रा यांनी माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार, चेहऱ्यावर सूज दिसण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. जसे की, झोप पूर्ण न होणे, जास्त सोडिअम असलेले पदार्थ, रात्री उशीरा जेवण, अ‍ॅलर्जी किंवा हार्मोन्समध्ये बदल. कधी कधी ही सूज किडनी किंवा थायरॉइडसंबंधी समस्यांमुळेही येते. अशात याची कारणं तुम्हाला माहीत असली पाहिजे जेणेकरून वेळीच तुम्ही योग्य ते उपाय करू शकाल.

कमी झोप किंवा झोपेची चुकीची पद्धत

जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल किंवा चेहरा उशीवर ठेवू झोपत असाल तर चेहऱ्या सूज दिसणं कॉमन कारण असू शकतं. जेव्हा तुम्ही योग्य पोजिशनमध्ये झोपत नाहीत, तेव्हा चेहऱ्यामध्ये फ्लूइड जमा होतं ज्यामुळे डोळे आणि गालांवर सूज दिसते. अशात प्रयत्न करा की रोज ७ ते ८ तासांची झोप घ्यावी.

हाय सोडिअम फूड किंवा उशीरा जेवण

जर रात्री तुम्ही चिप्स, चटपटीत, पिझ्झा किंवा प्रोसेस्ड फूड खाऊन झोपत असाल तर सकाळी चेहरा सूजलेला दिसतो. हाय सोडिअम फूड शरीरात पाणी रोखून ठेवण्याचं काम करतात, ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येते. रात्री जड काही खाल तर डायजेशनवर देळी प्रभाव पडतो आणि चेहऱ्यावर फ्लूइड रिटेंशन वाढतं. रात्री हलकं आणि कमी मीठ असलेलं जेवण करा. तसेच जेवण केल्यावर दोन तासांनी झोपावं.

डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता

भरपूर पाणी न प्यायल्यानं सुद्धा चेहरा सूजलेला दिसतो. तेव्हा शरीर हिडायड्रेट राहतं, तेव्हा पाण्याला रोखून ठेवतं ज्यामुळे चेहरा आणि डोळ्यांखाली सूज येऊ शकते. जर तुम्ही दिवसभर तुम्ही चहा, कॉफी, चटपटीत पदार्थ जास्त खात असाल तर पाणी कमी होतं. त्यामुळे दिवसभरातून कमीत कमी ७ ते ८ ग्लास पाणी प्यावं. सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावं.

अ‍ॅलर्जी किंवा स्किन रिअ‍ॅक्शन

अनेकदा अ‍ॅलर्जी किंवा स्किन रिअ‍ॅक्शनमुळे सुद्धा चेहरा सुजलेला दिसतो. ही अ‍ॅलर्जी काही खाल्ल्यानं, धूळ-मातीनं किंवा एखाद्या प्रॉडक्टच्या रिअ‍ॅक्शनमुळे होऊ शकते. जर डोळे, ओठ आणि गालांजवळ सूज असेल तर अ‍ॅलर्जीची टेस्ट करून घ्यावी.  

हार्मोनल बदल किंवा मेडिकल कंडीशन

महिलांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणा किंवा मेनोपॉज दरम्यान हार्मोन्समध्ये बदल होतात, त्यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते. त्याशिवाय थायरॉइड, किडनीची समस्या किंवा एखाद्या आजारामुळेही सूज येऊ शकते. जर ही समस्या जास्त दिवसांपासून होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

बचावाचे उपाय

चेहऱ्यावर सूज येऊ न देण्यासाठी काही सोप्या सवयी लावून घेऊ शकता. जसे की, रात्री लवकर आणि हलकं जेवण करा, भरपूर पाणी प्या, पुरेशी झोप घ्या आणि डोकं थोडं वर करून झोपा. सकाळी उठताच चेहऱ्यावर थंड पाणी मारा किंवा आइस पॅक लावा. मीठ कमी खा आणि फायबरयुक्त पदार्थ अधिक खा. 

Web Title: Expert tells the reasons you might be see a puffy face in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.