Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नजर धुसर झाली? रोजच्या आहारात ५ पदार्थ खा, चष्म्याच्या नंबर वाढणार नाही

नजर धुसर झाली? रोजच्या आहारात ५ पदार्थ खा, चष्म्याच्या नंबर वाढणार नाही

Eat These 5 Foods For Good Eye Sights : हिवाळ्याच्या दिवसांत पालक, मेथी  या भाज्यांचा आहारात समावेश करा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:17 IST2025-01-21T15:01:34+5:302025-01-21T16:17:15+5:30

Eat These 5 Foods For Good Eye Sights : हिवाळ्याच्या दिवसांत पालक, मेथी  या भाज्यांचा आहारात समावेश करा.

Eat These 5 Foods For Good Eye Sights : Top 5 Best Foods For Eye Health To Include In Your Diet | नजर धुसर झाली? रोजच्या आहारात ५ पदार्थ खा, चष्म्याच्या नंबर वाढणार नाही

नजर धुसर झाली? रोजच्या आहारात ५ पदार्थ खा, चष्म्याच्या नंबर वाढणार नाही

डोळ्यांचा कमकुवतपणा अनेक समस्यांचे कारण ठरतो. अनेकांमध्ये स्क्रिनचा वापर वाढणं हे  नजर कमजोर होण्याचं महत्वाचं कारण असतं. मोबाईल, टिव्ही, लॅपटॉपच्या सतत  संपर्कात आल्यामुळे डोळे कमकुवत होऊ लागतात.  स्क्रिनचा वापर जास्त करणं ही एक गंभीर समस्या आहे. (Top 5 Best Foods For Eye Health To Include In Your Diet)

याशिवाय  ताण-तणाव, पोषणाच्या कमकतरतेमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. अशा स्थितीत लहान मुलांसह मोठ्यांचेही डोळे कमकुवत होऊ लागतात. आजकाल लहान मुलांच्या डोळ्यांना चष्मा लागतो. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते काही पदार्थांचा आहारात  नियमित समावेश करून तुम्ही डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवू शकता. (Eat These 5 Foods For Good Eye Sights)

1) गाजर

गाजराला डोळ्यांसाठी एक बेस्ट फूड म्हटलं जातं. हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते गाजरात व्हिटामीन ए, बीटा कॅरोटीन असते. व्हिटामीन ए डोळ्यांसाठी फार फायदेशीर ठरते. बीटा कॅरोटीनच्या मदतीनं तुम्ही डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकता. या दोन्हींच्या मदतीनं डोळ्यांच्या पेशी चांगल्या जातात. हिवाळ्यात नियमित गाजराचा आहाराचा समावेश  केल्यास भरपूर फायदे मिळतील. भाज्या, सॅलेडच्या स्वरूपात तुम्ही गाजर खाऊ शकता. 

2) आवळा

आवळा हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात  खाल्ला जातो.  आवळ्यात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होतात.आवळा खाल्ल्यानं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते. डोळ्यांची रोशनी वाढते. हिवाळ्याच्या दिवसांत आहारात आवळ्याचा समावेश  करायला हवा. आवळ्याचं लोणचं, मुरांबा, आवळ्याची चटणी बनवून तुम्ही खाऊ शकता किंवा कच्चे आवळे खाऊ शकता. 

3) पपई

पपई पूर्ण वर्ष बाजारात असते पण हिवाळ्यात पपई खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. पपईत व्हिटामीन ए, व्हिटामीन सी आणि व्हिटामीन ई असते. हे व्हिटामीन्स डोळ्यांसाठी फार आवश्यक असतात. याच्या मदतीनं डोळ्यांवरील सुर्याची किरणं आणि गॅजेट्सचा साईड इफेक्ट कमी होऊ शकतो.

4) रताळे

रताळे हिवाळ्याच्या दिवसांत  भरपूर येतात. रताळ्यात व्हिटामीन ए, व्हिटामीन सी असते याची चवही चांगली असते. डोळ्यांचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी रताळे फायदेशीर ठरतात. नियमित आपल्या आहारात रताळ्यांचा समावेश केल्यास  डोळे चांगले राहतात. रताळे तुम्ही उकळवून, रोस्ट करून खाऊ शकता किंवा सॅलेडच्या स्वरूपात खाऊ शकता.

5) हिरव्या भाज्या

हिवाळ्याच्या दिवसांत पालक, मेथी  या भाज्यांचा आहारात समावेश करा. हिरव्या भाज्या  व्हिटामीन ए चा भंडार असतात. रोज या भाज्यांचे सेवन केल्यानं डोळे चांगले राहतात. रोजच्या आहारात या भाज्यांचा समावेश  करा.  याचे सेवन केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

Web Title: Eat These 5 Foods For Good Eye Sights : Top 5 Best Foods For Eye Health To Include In Your Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.