Join us

दही खा पण ’या’ चुका बिघडवतात पोट, पावसाळ्यात तर येते ॲडमिट व्हायची वेळ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2025 18:32 IST

Eat curd but 'these' mistakes can spoil your health, remember this during monsoon, health tips : दही खाताना काळजी घेणे गरजेचे. रोज खात असाल तर पाहा काय त्रास होऊ शकतो.

रोजच्या आहारात विविध पदार्थाचा समावेश असतो. त्यापैकीच एक म्हणजे दही. दही हा पदार्थ घरोघरी खाल्ला जातो. छान ताजे दही फार पौष्टिक मानले जाते. वजन कमी करण्यासाठी दही खावे. दह्यातील कोशिंबीरी खाव्यात. विविध सॅलॅड खावेत. जेवणानंतर काही जण ताक पितात तर काहींना दही खायची सवय असते. एकंदरीत दही हा आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. 

मात्र दही खाताना काही चुका केल्या तर त्या महागातही पडू शकतात. दही रोज खाणे चांगले असते असे अनेक जण सांगतात. त्याचा काही त्रास होणार नाही असेही सांगितले जाते. मात्र ते खरे आहे का नाही याची खात्री करुन घेणे गरजेचे असते. दही खाणे आरोग्यासाठी चांगले आहे मात्र कधी आणि कसे ते जाणून घ्या. 

 

उन्हाळ्यात दही खाणे पोटासाठी एकदम मस्त असते. तसेच उन्हाचा काही त्रास होऊ नये यासाठी दह्याची मदत होते. दही प्रोबायोटिक असते. त्यामुळे पचनासाठी, आतड्यांसाठी, चांगले असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. मात्र सगळ्याच ऋतूंमध्ये खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.  पावसाळ्यात दही जास्त खाणे चांगले नाही. त्यामुळे उन्हाळ्यात जसे दही खाता तसे पावसाळ्यात खाऊ नका. 

आपल्याला आई आजी सांगतात रात्रीच्या वेळी दही खाऊ नका. त्याला अनेक जण अंधश्रद्धा मानतात. मात्र तसे नसून रात्रीच्या वेळी दही खाल्याने सर्दी खोकला पटकन होतो. तसेच इतरही आजार होतात. दह्यातील काही घटकांमुळे म्युकस वाढते. 

दही इतर पदार्थांसोबत घेताना काळजी घ्या. कोणत्याही पदार्थांसोबत दही खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. जसे की जरी दही दुधाचेच असले तरी दही आणि दूध एकत्र कधीही घेऊ नका. तो विरुद्ध आहार आहे. वांग्यासारखी भाजी कधीही दह्यासोबत खाऊ नये. 

काही जणांमध्ये चेहर्‍यावरील पिंपल्स, मुरुम, डाग आदींमध्ये दह्यामुळे वाढ होते. सगळ्यांनाच दही सुट होत नाही. त्यामुळे व्हायरल उपाय पाहून करण्याआधी त्वचेचा पोत ओळखा. मग उपाय करा.    

टॅग्स : हेल्थ टिप्सअन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्य