Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर? पोषणतज्ज्ञ सांगतात, चांगल्या पचनासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती...

जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर? पोषणतज्ज्ञ सांगतात, चांगल्या पचनासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती...

Drinking water right after meals can harm digestion, know the right time to drink : right time to drink water after meals : drinking water after meals : effects of drinking water immediately after eating : जेवताना पाणी प्यावे की पिऊच नये? पाहा तज्ज्ञ काय सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2025 13:05 IST2025-08-28T13:04:15+5:302025-08-28T13:05:31+5:30

Drinking water right after meals can harm digestion, know the right time to drink : right time to drink water after meals : drinking water after meals : effects of drinking water immediately after eating : जेवताना पाणी प्यावे की पिऊच नये? पाहा तज्ज्ञ काय सांगतात...

Drinking water right after meals can harm digestion, know the right time to drink right time to drink water after meals drinking water after meals | जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर? पोषणतज्ज्ञ सांगतात, चांगल्या पचनासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती...

जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर? पोषणतज्ज्ञ सांगतात, चांगल्या पचनासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती...

अन्न पचनापासून ते शरीरातील रक्ताभिसरण नीट होण्यापर्यंत पाणी हे आपल्या शरीरात महत्वाची भूमिका बजावत. शरीराच्या पोषणासाठी पुरेशा प्रमाणात अन्न आणि पाणी पिण्याची (drinking water after meals) गरज असते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील अनेक कार्ये योग्य प्रकारे पूर्ण होत नाही, त्यामुळे अनेक प्रकारचे आजार आपल्याला त्रास देतात. योग्य प्रमाणांत पाणी न पिणं हे आपल्यासाठी हानिकारक ठरु शकते. जेवण झाल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर आपण पाणी पितोच(Drinking water right after meals can harm digestion, know the right time to drink).

अन्नाप्रमाणेच आपल्या शरीराला पाण्याची देखील तितकीच गरज असते. परंतु अनेकदा आपल्याला असा प्रश्न पडतो की, जेवण झाल्यावर किंवा काही खाल्ल्यावर नेमकं पाणी कधी प्यावं. काहीजण जेवण झाल्यावर लगेचच पाणी पितात तर याउलट काहीजण थोडा वेळ थांबून पाणी पितात, अनेकांना तर जेवताना मध्ये पाणी पिण्याची सवय असते. पाणी आपल्या पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते, पण पाणी नेमकं कधी प्यावं याकडे लक्ष न दिल्यास त्याचा पचनावर उलट परिणाम होऊ शकतो. जेवणानंतर चुकीच्या (can harm digestion, know the right time to drink : right time to drink water after meals) वेळी पाणी प्यायल्याने अपचन, पोटफुगी, गॅसेस यांसारख्या समस्या त्रास देऊ शकतात. त्यामुळे जेवणानंतर पाणी पिण्याची योग्य वेळ जाणून घेणं आवश्यक ठरतं. जेवणाआधी, जेवणासोबत किंवा जेवणानंतर नेमकं पाणी कधी प्यावं ते पाहूयात. 

१. जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे तोटे... 

डॉक्टरांच्या मते, जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. यामुळे पोटात गॅस आणि ॲसिडिटीची समस्या वाढू शकते. पोट फुगणे आणि जड वाटण्याची समस्या सतावू शकते. पचन व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. काहीवेळ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

ऐन तारुण्यात त्वचा लूज पडली, सुरकुत्या वाढल्या? 'असा ' करा स्किन टाईट करणारा घरगुती मास्क...

२. नेमके पाणी कधी प्यावे ?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अन्न पचायला किमान २ तास लागतात. या काळात पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. जेवणानंतर ४५ ते ६० मिनिटांनीच पाणी प्यावे. जर तुम्हाला आधी पाणी प्यायचे असेल, तर जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे योग्य ठरेल. अशा प्रकारे पाणी प्यायल्याने शरीर अन्नातील पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकते.

सणावाराला भरपूर खाणं होत ? ओव्हरइटिंगचा त्रास, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ टिप्स - 'अशी' घ्या तब्येतीची काळजी...

प्रेग्नंन्सी, वेटलॉसमुळे त्वचेवर आले भयंकर स्ट्रेच मार्क्स? वापरा हे पारंपरिक तेल - स्ट्रेच मार्क्स होतील झटपट कमी... 
 

३. योग्य वेळी पाणी पिण्याचे फायदे... 

जेवणानंतर साधारणतः एक तासाने पाणी प्यायल्यास शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. 

१. वजन नियंत्रणात राहते आणि लठ्ठपणा वाढत नाही.

२. पचनशक्ती सुधारते आणि पोट हलके वाटते.

३. गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होत नाही.

४. अन्नातील पोषक तत्वांचे शोषण चांगल्या प्रकारे होते.

५. झोपेची गुणवत्ता सुधारते आणि शरीर अधिक रिलॅक्स होते. 

जेवणानंतर लगेच पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. पण, जर तुम्ही योग्य वेळी पाणी प्यायले, तर त्यामुळे केवळ पचनच सुधारत नाही, तर लठ्ठपणा, ॲसिडिटी आणि पोट फुगण्यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

Web Title: Drinking water right after meals can harm digestion, know the right time to drink right time to drink water after meals drinking water after meals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.