Drinking Water in Malasana : सकाळी झोपेतून उठल्यानंतर उपाशीपोटी पाणी पिण्याचा सल्ला जवळजवळ सर्व डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञ देतात, कारण सकाळी पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. मात्र पाणी कशा पद्धतीने प्यावे, हे फारच कमी लोकांना माहीत असतं. बरेच लोक सकाळी पलंगावर बसूनच पाणी पितात किंवा उभे राहून पाणी पितात. पण आपल्याला माहिती आहे का की सकाळी आपण शौचास बसतो त्या स्थितीत बसून मलासनात बसून पाणी प्यायल्याने अनेक खास फायदे होतात? आचार्य मनीष यांच्या मते, सकाळी आपण शौचास बसतो त्या स्थितीत बसून पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. तेच आज आपण पाहणार आहोत.
पाय गुडघ्यात वाकवून, टाचांवर बसून पाणी पिण्याचे फायदे
आचार्य मनीष सांगतात की सकाळी पाय गुडघ्यात वाकवून, टाचांवर बसून पाणी पिणे खूपच लाभदायक आहे. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि शरीर अॅक्टिव्ह मोडमध्ये राहतं. तसेच बद्धकोष्ठता, फिशर आणि प्रोस्टेटसारख्या समस्यांमध्येही आराम मिळतो, कारण ही पद्धत शरीराच्या नैसर्गिक प्रक्रिाया सुधारते.
पचनक्रियेत सुधार
या स्थितीत बसून पाणी प्यायल्याने पोटावर नैसर्गिक दबाव येतो, ज्यामुळे पचनक्रिया जलद आणि प्रभावी होते. याचा फायदा म्हणजे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीसारख्या तक्रारी कमी होतात.
मेटाबॉलिझम बूस्ट
पाय गुडघ्यात वाकवून, टाचांवर बसून पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढतो. ही शरीराची नैसर्गिक मुद्रा असल्यामुळे आतडी, विशेषतः लिव्हर आणि किडनी अधिक सक्रिय होतात. त्यामुळे शरीर अधिक कार्यक्षमतेने काम करते आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्यास याचे फायदे अधिक मिळतात.
शरीराची आतून सफाई
ही पद्धत डिटॉक्सिफिकेशनसाठी अत्यंत प्रभावी आहे. पाय गुडघ्यात वाकवून, टाचांवर बसून पाणी प्यायल्याने लिव्हर आणि किडनीचे कार्य सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
त्वचेला नैसर्गिक चमक
शरीर आतून स्वच्छ झाल्यामुळे त्वचा निरोगी आणि तेजस्वी दिसू लागते. त्यामुळे पाय गुडघ्यात वाकवून, टाचांवर बसून पाणी पिणे हे केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.
किडनीचं आरोग्य चांगलं राहतं
मलासनात बसून पाणी प्यायल्याने किडनीची कार्यक्षमता वाढते. याने किडनीचा फ्लो सुधारतो. ज्यामुळे यूरिनरी ट्रॅक्टची सफाई होते आणि किडनीसंबंधी समस्यांचा धोकाही कमी होतो.
तणाव कमी होतो
या आसनामध्ये बसून पाणी प्यायल्याने मानसिक शांतता मिळते आणि तणावही कमी होते. याने दिवसाची सुरूवात केली तर दिवसभर ताजंतवाणं वाटतं.
कसं प्याल पाणी?
सकाळी रिकाम्या पोटी सगळ्यात आधी मलासनात बसा. एक ग्लास कोमट पाणी हळूहळू प्या. यादरम्यान पाठ ताठ असली पाहिजे. या स्थितीमध्ये कमीत कमी 5 ते 10 मिनिटे बसा.
