lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हळदीचं दूध चांगलं पण हे ४ आजार असतील तर चुकूनही पिऊ नका; लिव्हर-किडनीसाठी धोक्याचं

हळदीचं दूध चांगलं पण हे ४ आजार असतील तर चुकूनही पिऊ नका; लिव्हर-किडनीसाठी धोक्याचं

Does Too Much Turmeric Have Side Effects : काही वेळा हळदीचे पदार्थ प्रकृतीसाठी गरम  ठरतात. हळद दूध प्यायल्याने  एलर्जीचा त्रासही वाढू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 03:43 PM2023-09-07T15:43:52+5:302023-09-07T18:53:28+5:30

Does Too Much Turmeric Have Side Effects : काही वेळा हळदीचे पदार्थ प्रकृतीसाठी गरम  ठरतात. हळद दूध प्यायल्याने  एलर्जीचा त्रासही वाढू शकतो.

Does Too Much Turmeric Have Side Effects : Amazing Health Benefits of Turmeric Milk | हळदीचं दूध चांगलं पण हे ४ आजार असतील तर चुकूनही पिऊ नका; लिव्हर-किडनीसाठी धोक्याचं

हळदीचं दूध चांगलं पण हे ४ आजार असतील तर चुकूनही पिऊ नका; लिव्हर-किडनीसाठी धोक्याचं

हळद फक्त (Turmeric Milk) एक मसालायुक्त पदार्थ नसून एक आयुर्वेदीक औषध सुद्धा आहे. वातावरणात बदल होताच सर्दी- खोकला, ताप यांसारखी लक्षणं जाणवतात. पावसाळ्यात इम्यूनिटी वाढवण्यासाठी हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हे दूध प्यायल्यानं तब्येतीला त्वरीत आराम मिळतो. (Amazing Health Benefits of Turmeric Milk) हळद एंटी ऑक्सिडेंट्स, एंटी सेप्टीक आणि एंटी इंफ्लेमेटरी गुणांनी समृद्ध असते. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि तुम्ही लवकरात लवकर रिकव्हर होता.(Does Too Much Turmeric Have Side Effects)

या दूधाने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. तर काहीवेळा दूध शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. तुम्हाला जर काही आरोग्याच्या समस्या असतील ज्यात तुम्ही हळदीचं दूध प्यायलात तर त्रास वाढू शकतो. यामुळे लिव्हर आणि किडनी फेल होण्याचा धोका असतो. हळदीचं दूध कोणत्या स्थितीत पिऊ नये ते पाहूया. ज्या लोकांना गरम पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो. त्यांनी हळदीच्या दूधाचे सेवन करू नये.  काही वेळा हळदीचे पदार्थ प्रकृतीसाठी गरम  ठरतात. हळद दूध प्यायल्याने  एलर्जीचा त्रासही वाढू शकतो. (Turmeric Milk Benefits And Side Effects To Know)

रक्ताची कमतरता असल्यास

ज्या लोकांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते त्यांनी आयर्नयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. (Side Effects of Turmeric Milk) दूध प्यायल्याने शरीरात आयर्न पुरेपूर शोषलं जात नाही. ज्यामुळे हिमोग्लोबीन व्यवस्थित  तयार होत नाही.  म्हणूनच एनिमिया असलेल्यांनी हळदीच्या दूधाचे सेवन करू नये.

चरबी वाढल्यानं शरीर थुलथुलीत दिसतंय? ५ व्हेज पदार्थ खा, मसल्स होतील स्ट्रॉग-दिसाल सुडौल

लिव्हर प्रॉब्लेम असल्यास 

जे लोक लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांनी हळदीच्या दूधाचे सेवन करू नये. अशा स्थितीत दूध प्यायल्याने नुकसान पोहोचू शकतं.  यामुळे लिव्हरच्या समस्या वाढतात.

किडनीच्या समस्या

रिसर्चनुसार हळदीत करक्यूमिन नावाचे तत्व आढळते. यात ऑक्सालेट्स जास्त प्रमाणात असतात. यामुळे शरीरात किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो. किडनी फेल होण्याचा धोकाही वाढतो.

प्रोटीन हवं तर महागाईमुळे खिशाला परवडत नाही? रोज हे ७ व्हेज पदार्थ खा, बिंधास्त करा प्रोटीन डाएट

रोज किती प्रमाणात हळद शरीरात जायला हवी?

रोज हळदीचा एक छोटा चमचा सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यापेक्षा जास्त हळदीचे सेवन केल्याने रिएक्शन ट्रिगर होऊ शकते हळदीचे दूध कमीत कमी प्रमाणात घ्यायला हवं. एक कप दूधात  २ चिमुट हळद घालून प्यावे.

Web Title: Does Too Much Turmeric Have Side Effects : Amazing Health Benefits of Turmeric Milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.