Does Eating Sugar Turn Teeth Yellow : दात पिवळे होणे ही बऱ्याच लोकांची समस्या आहे. दात पिवळे होण्याची कारणे वेगवेगळी असतात. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न येतो की, जास्त साखर खाल्ल्याने दात पिवळे होतात का? यावर एक्सपर्ट सांगतात की, साखर दातांना थेट पिवळे करत नाही, पण तशी परिस्थिती नक्कीच तयार करते. ज्यामुळे दातांचा रंग बदलतो आणि अनेक गंभीर समस्या होतात. अशात जाणून घेऊया की, साखरेने डायबिटीसशिवाय आणखी काय काय समस्या होतात.
साखरेने कशाचा धोका?
जेव्हा आपण गोड गोष्टी जसे की, कँडी, कुकीज खातो किंवा सॉफ्ट ड्रिंक्स घेतो तेव्हा तोंडातील बॅक्टेरिया साखरेला तोडून अॅसिड तयार करतात. colgate च्या रिपोर्टनुसार, हे अॅसिड दाताच्या वरच्या थराचं नुकसान करतं. हळूहळू दातावरील थर कमजोर होतो आणि दातांवर प्लाक जमा होऊ लागतं. ज्यामुळे दात पिवळे दिसतात. या प्रक्रियेमुळे पुढे जाऊन दाताना किड लागते. या अॅसिडमुळे दातांवर छोटी छोटी छिद्र पडतात. जे पुढे वाढतात. जर वेळीच उपचार घेतले नाही तर इन्फेक्शन दाताच्या आत पसरतं. ज्यामुळे वेदना, इन्फेक्शन, दात तुटण्याची सु्द्धा वेळ येऊ शकते.
असं असलं तरी शरीर स्वत: हे नुकसान काही प्रमाणात ठीक करतं. लाळेत असलेल्या कॅल्शिअम आणि फॉस्फोटने दात पुन्हा मजबूत होण्यास मदत मिळते, ज्याला रीमिनरलायजेशन म्हटलं जातं. पण जर दिवसभर पुन्हा पुन्हा गोड खाल किंवा तोंड कोरडं राहत असेल तर याने संतुलन बिघडतं आणि नुकसान जास्त होतं.
लठ्ठपणा वाढतो, त्वचा सैल होते
दातांशिवाय जास्त साखरेचा प्रभाव पूर्ण शरीरावर बघायला मिळतो. नेहमीच जास्त प्रमाणात साखर किंवा गोड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो, ज्यामुळे पुढे जाऊन डायबिटीसचा धोका निर्माण होतो. तसेच हृदयरोगाचा देखील धोका वाढतो. त्याशिवाय जास्त साखरेमुळे त्वचेचं वय वाढण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि त्वचा सैल व निर्जीव दिसू लागते. काही सवयींमुळे हा धोका अधिक वाढतो. जसे की, पुन्हा पुन्हा गोड स्नॅक्स खाणे, गोड किंवा अॅसिडिक ड्रिंक्स घेणे, चिकट चॉकलेट किंवा कँडी खाणे. असं केल्याने दात जास्त वेळ अॅसिडच्या संपर्कात राहतात आणि नुकसान अधिक होतं.
बचावाचे उपाय
साखरेपासून होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी साखर कमी प्रमाणात कावी. गोड पदार्थ दिवसभर खाण्याऐवजी जेवणासोबत खावेत. तसेच शुगर फ्री च्युइंगम चघळा, भरपूर पाणी प्या आणि नियमितपणे ब्रश व फ्लॉस करून दात निरोगी ठेवू शकता. एक्सपर्ट सांगतात की, साखर पूर्णपणे सोडणं गरजेचं नाही. पण संतुलन आणि तोंडाची योग्य काळजी घेतली तर नुकसान टाळता येऊ शकतं.
